गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार


प्रेम स्वरुपांनो ,
          " दिव्य अवतारांसाठी जन्म दिवसांसारखे विशेष दिवस नसतातच , ज्या दिवशी तुमच्या हृदयात पवित्र विचार उपजतील , वृत्ती आणि वर्तनात बदल होईल , शुद्ध आणि निस्वार्थी भावाने तुम्ही सेवा करण्याचा निश्चय कराल , तो दिवस तुमच्यासाठी दिव्यत्वाचा जन्म दिवस असेल . " 
                                                                     बाबा



श्री वसंतासाईच्या ( अम्मा ) जन्मदिनानिमित्य


             स्वामींचा जन्म २३-११-१९२६, सोमवार, पौर्णिमेला झाला . माझा जन्म २३-१०-१९३८ रविवार, अमावस्येला झाला . चंद्र प्रेमाशी संबंधित आहे, तो प्रेमाचा पुरस्कर्ता आहे तर सूर्य ज्ञानाचा पुरस्कर्ता आहे . अमावस्येच्या दिवशी त्या दोघांची भेट होते . सूर्य आणि चंद्र यांचा संयोग हा ज्ञान आणि प्रेम यांच्या संयोगाचे प्रतिक आहे . नरकासुर वधाचे स्पष्टीकरण देताना स्वामी म्हणाले की, मी सर्वांमध्ये ज्ञानाग्नी चेतवून त्यांच्यातील अज्ञानरुपी अंधःकारचा नाश करेन . सोमवार - चंद्राचे प्रतिक व रविवार - सूर्याचे प्रतिक सूर्यामधून ज्ञानोदय झाला . अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करण्यासाठी माझा जन्म रविवारी झाला . 
             स्वामी आनंद आहेत , तर मी अश्रूंमध्ये बुडालेली आहे . हे वैधर्म्य का ? याच उत्तर स्वामींनी ' इथेच , या क्षणी , मुक्ती ' या पुस्तकाच्या पहिल्या भागातच दिले आहे . आम्ही दोघं, एक धनभारित तर दुसरा ऋणभारित . जसे धनभारित ( positive ) आणि ऋणभारित ( negative ) टोकं एकत्र आल्यावर शक्तिशाली विद्युत उर्जेची निर्मिती होते तसे स्वामींच माझ्यावरील प्रेम आणि माझं स्वामींवरील प्रेम शक्तिशाली कृपा लहरींमध्ये बदलते आणि अखिल जगतावर अनुग्रह करते .





पुष्प २८ पुढे सुरु

            आता आपण या विषयी पाहू . गेले तीन दिवस मी शिंकांनी बेजार झाले आहे . याची सुरुवात ४ जुलैला झाली . मला अगदी असह्य झाल्यामुळे मी स्वामींना याचं कारण विचारले . स्वामी म्हणाले , " पृथ्वी तत्वाशी संबंधित स्तूपाच्या ५ व्या प्रकाराचा निर्देश करते . मी सहन करत असलेल्या क्लेशांद्वारे जगावर कोसळणाऱ्या मोठमोठ्या आपत्ति टाळल्या जातात . तसेच तीव्र भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक या सारख्या नैसर्गिक आपत्तिंमधून होणारा भयानक संहार थांबविला जात आहे . मी अनेक डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला परंतु गुण आला नाही . देहाच्या गाभ्यामधून येणाऱ्या शिंकानी माझा जीव अगदी हैराण झाला होता . अंगदुखीमुळे मला चालणेही अशक्य झाले होते . भयानक त्रास होत होता . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम 
     

1 टिप्पणी: