गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" भक्तीचे विस्तृतीकरण म्हणजेच ज्ञान ."

पुष्प २८ पुढे सुरु

७ जुलै २०१३ , प्रातः ध्यान 
वसंता : स्वामी , तुम्ही यायलाच हवे . तुम्ही २७ मे ह्या आपल्या विवाह दिनासाठी मंगळसूत्र दिलेत ; नंतर आपल्या वडकमपट्टीला संपन्न झालेल्या १९ जून ह्या विवाह दिनाकरिता दुसरे मंगळसूत्र दिलेत . आता गुरुपौर्णिमा येत आहे . व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने  तुम्ही मला काही देणार नाही का ? 
स्वामी : चल , आपण स्वर्गलोकात जाऊ . 
दिव्य दृश्य 
            स्वामींसमवेत मी स्वर्गात प्रवेश केला . सर्वजण  आले . मी व्यासऋषींना म्हटले , " हे व्यास भगवान , स्वामींच्या येण्यासाठी तुम्ही कृपा करून काहीतरी करा . 
व्यास म्हणाले , " स्वामी नक्की येतील ! " नंतर इंद्रानी विनंती केली , " स्वामी सर्व देव तुमचे दर्शन घेऊ इच्छितात ." स्वामी म्हणाले , " ठीक आहे . त्या सर्वांना इकडे येण्यास सांग . " सर्व देव आले . वरूण  देवाने स्वामींना विचारले , " स्वामी आम्हाला  खूप त्रास भोगावा लागत आहे . या कलियुगात आम्हाला  अडचणींना तोंड द्यावे लागत आहे .  आम्ही अम्मांचा आश्रय घेऊन  त्यांच्या देहात प्रवेश केला . आता आम्ही बाहेर पडू . " सर्वजण  रजा घेतात .
वसंता : स्वामी, याचा अर्थ काय ? 
स्वामी :  ह्या कलियुगातील प्रचंड प्रदूषणामुळे सर्व  देवांनी तुझ्या देहामध्ये आसरा घेतला . तू आदिशक्ती आहेस . पंचमहाभूते प्रथम तुझ्या देहातून बाहेर पडतील . 
वसंता : स्वामी तुम्ही सांगितल्यानुसार , जगामध्ये ९१ भूकंप आणि ९ ज्वालामुखींचा उद्रेक झाला . हे मी कसे बरं थांबवले ? 
स्वामी : या  घटना याहून  खूप मोठ्या प्रमाणात घडल्या असत्या परंतु तू त्यांना प्रतिबंध करून त्यामुळे होऊ घातलेला महासंहारही थांबवलास . हे सर्व तुझ्या देहावर झेलून तू ह्या यातना सोसत आहेस .
ध्यान समाप्त 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साई राम          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा