गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " आपली चिंता व आपले अश्रू जे पूर्वनिर्धारित असते त्यामध्ये बदल करू शकत नाही . त्या ऐवजी तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळा, तुमच्या चिंतेचे त्याच्या दर्शनाच्या विनवणीमध्ये  परिवर्तन करा."

वसंतामृतमाला 
पुष्प २८ 
प्रलय आणि नवनिर्मिती

  
४ जुलै २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही २२ जुलै म्हणजे २२ / ७ असे दाखविण्यास बटनावर ' पाय ' ( गणितातील एक संज्ञा ) चे चिन्ह काढलेत . तुम्ही मला वेद , वेदांत , योग अशा सर्व विषयां विषयी सांगता . तथापि सकाळी लिहलेला मजकूर मी संध्याकाळी विसरून जाते . असे असता मी कशी बरं तुमची शक्ती ? तुम्ही भगवान आहात . 
स्वामी - जे मी जाणतो ते सर्व तुलाही ज्ञात आहे ; फक्त ते तुझ्यात सुप्तावस्थेत आहे . जर ते तुझ्याद्वारे अभिव्यक्त झाले असते तर तुही भगवंत होऊन माझ्यासारखे भाष्य केले असतेस . त्याने विश्वाला कसा लाभ झाला असता ? मी ८४ वर्षे उपदेश केला परंतु किती जणांमध्ये परिवर्तन घडले ? विरहवेदनांनी अश्रू ढाळत जगाला बदलण्यासाठी तू ' मी विना मी ' बनून येथे आलीस . आपण दोघं एक आहोत . तू माझी अर्धांगी आहेस . वास्तविक आपण दोघं शिवशक्ती असल्याचे जगाला दर्शविण्याकरीता आपण येथे आलो आहोत . 
ध्यान समाप्त 
            आता आपण याविषयी पाहू . मी दररोज स्वामींचे व्हिडीओ पाहते, त्यांची पुस्तके वाचते . या महाअवताराने वेद आणि उपनिषदांचे वर्ग घेऊन सर्व काही शिकविले . जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी त्यांना ज्ञात आहेत . मला काहीही माहिती नसते . सकाळी लिहिलेले मी संध्याकाळी विसरून जाते . असे असताना कसे बरं त्यांची शक्ती होईन ? सदैव याविषयी चिंता करत मी अश्रू ढाळत असते . ह्याचे कारण आता स्वामींनी सांगितले . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा