रविवार, ३१ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सत्य हे सत्यस्वरूपात अस्तित्वात असते."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरु 

                    कानावर पडणारा प्रत्येक शब्द तात्काळ परमेश्वराशी जोडण्याचा प्रयत्न करा. उदा. तुम्ही मोर शब्द ऐकलात तर तुम्हाला मुकुटांवर मोरपीस धारण करणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण व्हायला हवे. कोकीळ शब्द ऐकलात तर तुम्हाला कृष्णाच्या मुरलीचे मधुर स्वर आठवले पाहिजेत. 
                  जर एखाद्याने तुम्हाला विचारले, " तुम्ही कधी आलात ?" तर त्यावर मी कधी आलो ? माझे मूळ स्थान कोणते आहे ? परमेश्वराचे वास्तव्य असलेल्या माझ्या मूळस्थानाशी मी परत कसा जाऊ ? तुमच्या मनामध्ये अशी विचारप्रक्रिया सुरु व्हायला हवी. सुरुवातीला जरा हे कठीण वाटेल, परंतु सरावाने ते अंगवळणी पडेल आणि पडायलाच  हवे. 
                   प्रवास करताना तुम्ही रस्त्यावरच्या पाट्या वाचत असाल, उदा. तुम्ही ' शंकर शक्ती सिमेंट ' अशी पाटी पाहिलीत तर तुम्ही मनात भगवान शंकर आणि पार्वती देवी यांच्याविषयी विचार केला पाहिजे. जर तुम्ही मथुरा शब्द वाचलात तर कृष्णाविषयी विचार करा. जर वसंत आणि कंपनी अशी पाटी वाचलीत तर वसंतसाई मंत्राचा विचार करा. 
                 अशातऱ्हेने मी माझ्या दिनचर्येमध्ये आणि नित्य कर्मांमध्ये गर्भितार्थ शोधत असते. तुम्हीही तुमची सर्व नित्यकर्मे परमेश्वराशी जोडून प्रेमभावे करा आणि कर्मफलाची अपेक्षा न ठेवता त्यालाच अर्पण करा. या कार्यप्रणालीतून अन्नामध्ये, घरामध्ये, गावामध्ये तसेच देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रेमस्पंदने पसरतात. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २८ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर हाच एकमात्र गुरु आहे."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरु 

* संध्याकाळी व्हरांड्यामध्ये बसून धार्मिक ग्रंथाचे, पुराणातील कथांचे वाचन करत असे. झोपायला जाण्यापूर्वी वेदिकेवर स्वामींचे दृश्यरुपी आशीर्वाद ( उदा. विभूती, चंदन अमृत इ. ) मिळाले आहेत का ते नीट निरखून पाहत असे. 
ॐ 
                    थोडक्यात सांगायचे तर २४ तास परमेश्वराचे पूजन चिंतन हेच खरे माझ्या जीवनाचे सूत्र. या ' मी विना मी ' ला साईस्वरूप प्राप्त करून देणाऱ्या गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या तपाची व साधनेची ही छोटीशी झलक आहे. 
तोड - जोड 
                   लहानपणापासूनच मला एक सवय आहे. मी जे जे काही पाहते ते मी परमेश्वराशी जोडते. गृहस्थधर्म पाळत असताना मी या सवयीचा उपयोग करून घेतला. घरातील सर्व कर्तव्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मी परमेश्वराशी जोडल्या. उदा. दरवाजा पाहिला की माझ्या मनात येत असे, की हा काही साधारण दरवाजा नाही हा स्वर्गाचा दरवाजा आहे. खिडकी पाहिली की विचार करत असे की ही माझ्या हृदयाची खिडकी आहे, ज्यामधून मी परमेश्वराचे दर्शन घेऊ शकते. झोपाळा मला राधाकृष्णाची आठवण करून देत असे व मी अशी कल्पना करत असे, की ते माझ्या हृदयात झोके घेत आहेत. अशातऱ्हेने आपण पहात असलेले सर्व काही परमेश्वराशी जोडू शकतो. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २४ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " योग्य वेळ येताच परमेश्वर कवच तोडून आपल्याला मुक्त करेल."

प्रकरण तिसरे 

 मूळ पुढे सुरु 

* गृहकृत्ये  करताना मी प्रत्येक कर्म परमेश्वराशी जोडत असे. केर काढताना मी मंदिराचा केर काढते आहे असा विचार करे. भांडी घासताना पूजेची उपकरणी घासते आहे अशी कल्पना करे. मुलांसाठी वेळ देताना मी भगवान श्री कृष्णाच्या मुलांसाठी वेळ देत आहे असे समजत असे. कामाचा कितीही बोजा असला तरी मी माझी ध्यानाची वेळ कधीही चुकवली नाही. कधीही त्यामध्ये तडजोड केला नाही वा वेळेत बदल केला नाही. 
* गेली अनेक वर्षे मी सकाळी विष्णुसहस्रनाम व स्वामी सहस्त्रमनाम  म्हणत असे आणि संध्याकाळी पुन्हा विष्णुसहस्रनाम म्हणत असे. प्रवासामध्ये असताना बसमध्ये बसल्या बसल्या मी विष्णुसहस्रनाम म्हणण्यास सुरुवात करत असे. 
* दुपारी १२ वाजता मी प्रार्थना गृहात जाऊन ध्यान करत असे. 
* पुन्हा संध्याकाळी ४ वाजता प्रार्थना गृहात जाऊन ध्यान करत असे व त्यांनतर भजन, अष्टोत्तरम्  आणि आरती करत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात..... 

जय साई राम

गुरुवार, २१ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " परमेश्वराने आपल्याला अमृतपुत्र म्हणजे हुबेहूब त्याचा नमुना म्हणून निर्माण केले आहे.

प्रकरण  तिसरे 

मूळ पुढे सुरु 

* स्नानानंतर मी स्वामींच्या पादुकांना अभिषेक करत असे. अभिषेक करताना स्वामी साक्षात माझ्या समोर पादुकांवर उभे आहेत अशी मी कल्पना करत असे. अभिषेकानंतर मी  स्वामींना नैवेद्य दाखवत असे. दिवसभरात  बनवलेले सर्व पदार्थ स्वामींना अर्पण करत असे. स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही कधीही अन्न ग्रहण करत नाही.

उर्वरित  मजकूर पुढील भागात   ..... 

जय साई राम

रविवार, १७ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपण केवळ परमेश्वराचे आहोत अन्य कोणाचेही नाही."

प्रकरण तिसरे 
 
मूळ पुढे सुरू 

* या सर्व प्रार्थना झाल्यावर मी स्वयंपाकगृहात जात असे. तिथे मी विभूतीची डबी ठेवते. त्यातील विभूती घेऊन मी गॅसस्टोव्ह व सिलेंडरवर ॐ हे पवित्र अक्षर लिहित असे आणि ' मातृ देवो भव पितृ देवो भव अग्नी देवो भव अतिथी देवो भव ' हा श्लोक म्हणून, स्टोव्हला अग्निकुंड मानून अग्निदेवाची प्रार्थना करत असे की अग्निसंस्कार केलेल्या या अन्नामधून आम्हा सर्वांना सत्वगुणांचा लाभ होवो आणि मग यज्ञकुंडातील पवित्र अग्नी प्रज्वलित करण्याचा भाव मनात ठेवून मी गॅस पेटवत असे. अशा तऱ्हेने माझे स्वयंपाकघरातील काम पुढे चालू होत असे. मी भजने म्हणत वा स्वयंपाकघरात ठेवलेल्या स्वामींच्या फोटोशी संवाद करत स्वयंपाक करत असे. 
* स्नान करण्यापूर्वी मी त्या पाण्याला स्पर्श करून त्यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, कृष्णा, नर्मदा आणि चित्रावती या सप्तसिंधूंच्या पवित्र जलाचे अस्तित्व आहे असे मानून गंगामातेला प्रार्थना करत असे की तिच्या पवित्र जलाने माझ्या सर्व पापांचा नाश होवो. स्नान करताना मी विभूती कवचाचे उच्चारण करून म्हणत असे,' ही साईंची विभूती माझे रक्षण करो, रक्षण करो. माझे मस्तक, माझे डोळे तसेच माझ्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करो. ' आणि हे म्हणत असताना साबण लावून माझे स्नान पूर्ण होत असे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साई राम 

गुरुवार, १४ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " संयम आणि एकाग्रमन याद्वारे मनामध्ये सुविचार व सद् भावना निर्माण होतात."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

* तोंड धुताना व दात घासताना मी भिंतीवर लावलेल्या गीतेतील श्लोकांवर चिंतन करत असे. महात्मा गांधींची ही सवय मी आत्मसात केली. 
* ३ वाजून ४० मिनिटांनी मी प्रार्थनागृहात जाऊन ध्यान करत असे.
* सकाळच्या ध्यानानंतर मी देवदेवतांच्या तसबिरींपुढे उभी राहून पूजा प्रार्थना करत असे. आमच्या घरात श्री रंगनाथाचे खूप फोटो होते. मी त्यांना प्रार्थना करत असे की मलाही आंडाळसारखे सदेह साईरंगामध्ये विलिन व्हायचे आहे. मी श्रीकृष्णाच्या फोटोपुढे उभी राहून, त्यांनी त्यांच्या राधेचा स्वीकार करावा अशी आर्जवपूर्वक त्यांची प्रार्थना करत असे. गांधीजींच्या फोटोसमोर उभी राहून त्यांनी मला माझ्या दोन नेत्रांप्रमाणे असणारी अहिंसा व सबुरी द्यावी अशी प्रार्थना करत असे . रामकृष्णांच्या फोटोसमोर उभी राहून मी त्यांना प्रार्थना करते असे की त्यांनी माझ्या सुख आणि धन याविषयी असणाऱ्या आसक्तीचा नाश करावा. 
* श्री  आंडाळच्या फोटोपुढे उभी राहून मी म्हणत असे " तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहात. तुमच्यासारखे मलाही सदेह परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचे आहे. तुम्ही मला असा वर द्या."
* माझी नित्यप्रार्थना करताना मी म्हणत असे " या जगातील समस्त जीव, चराचर सृष्टी, ज्ञानी, भक्त, मुक्त, जीवनमुक्त, चिरंजीवी, सिध्दपुरुष आणि सर्व देवदेवतांनो मी तुमच्यापुढे नतमस्तक होते. याचबरोबर मी दररोज गायत्री मंत्राचा जपही करत असे. एखादेवेळेस मी जरी विसरले तरी आपोआप या प्रार्थना माझ्या ओठांवर येतात. इतके ते स्वाभाविक बनून गेले आहे. केवळ सरावानेच चांगल्या सवयी अंगी बाणवल्या जाऊ शकतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, १० जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

               " दर दिवसागणिक आपले आयुष्य कमी कमी होत आहे. परमेश्वरप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही काही करणार नाही का? "

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

                   त्यानंतर २३ जानेवारी १९८४ रोजी मदुराईमधील गांधी म्युझियम येथे मला स्वामींचे पहिले दर्शन झाले. म्युझियममध्ये काम करणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्राने आम्हाला स्वामींच्या भेटीविषयी माहिती दिली. मला अत्यानंद झाला. मी माझे वडील व पती स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. दुर्दैवाने मी स्वामींपासून खूपच दूर अंतरावर होते. मला स्वामींना नीट पाहतासुद्धा आले नाही. त्यामुळे मी निराश झाले. तरीपण आम्हाला सकाळी अर्धा तास स्वामींचे दर्शन होऊ शकले. २९ जून १९८५ - मी दीड वर्षानंतर पुट्टपर्तीला गेले आणि स्वामींचे दर्शन घेतले !

अहोरात्र परमेश्वराच्या संगतीत 
                   ज्या माझ्या ३५ वर्षाच्या दिनचर्येनी मला परमेश्वराच्या चरणाप्रत नेले, ती दिनचर्या मी वाचकांसाठी खाली देत आहे. ती त्यांना नक्कीच सहाय्यभूत ठरेल. 
* मी दररोज पहाटे ३ वाजता उठत असे व करदर्शन घेऊन प्रार्थना करत असे, ' हे दोन्ही हात सदैव देते असावेत, कधीही घेते नसावेत.'
* उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी मी पृथ्वीमातेला प्रणाम करून तिची प्रार्थना करत असे व तिला पायदळी तुडवल्याबद्दल तिची क्षमा मागत असे. 
* त्यानंतर मी ' दिनम् दिनम्  श्रीरंग दर्शनम  ' असे म्हणून उत्तरेकडे सात पाऊले टाकून श्रीरंगाला प्रणाम करत असे. ' तसेच दिनम् दिनम् पुट्टपर्तीदर्शनम ' म्हणून पुट्टपर्तीच्या दिशेने सात पाऊले टाकून प्रणाम करत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 
जय साईराम

गुरुवार, ७ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " निमितीतील सूक्ष्मात सूक्ष्म जिवापासूनही शिकण्याची विनयशीलता ज्यांच्यामध्ये असते त्यांनाच  ईश्वरप्राप्ती होते. " 

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

                    १९७४ मध्ये माझ्या चुलत भावाकडून मी सत्य साई बाबांविषयी प्रथम ऐकले होते. त्यांनी मला कालीगुडी येथील ग्रंथालयात असलेल्या एका  पुस्तकाविषयी सांगितले होते. ३० मे १९७४ रोजी तेथील ग्रंथालयात मला ' सत्यम, शिवम, सुंदरम ' हे पुस्तक मिळाले. मी ते पूर्ण वाचले आणि स्वतःला हरवून बसले. मला स्वामींचे दर्शन घेण्याची उत्कंठा लागून राहिली; परंतु त्यासाठी काय करावे हे कळेना. मी त्यांना घट्ट धरून बसले. मी त्यांच्यासाठी अविरत अश्रू ढाळत होते. माझे वडील मला म्हणाले, की तू तीर्थयात्रा कर आणि नंतर पुट्टपर्तीला जा. 
                    १९८२ साली मी व माझे पती विशेष रेल्वेने ४० दिवसाच्या यात्रेवर निघालो. आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, पंढरपूर, कलकत्ता, काश्मीर ते रामेश्वरम या ठिकाणी गेलो, प्रत्येक तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. या यात्रेच्या दरम्यान मला अनेक संस्मरणीय अनुभव आले. माझ्या वडीलांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तीर्थयात्रा पूर्ण केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ३ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

               " खऱ्या अर्थाने परमेश्वराचा शोध घेणाऱ्यांना सिद्धी नको असतात कारण सिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे होय."

प्रकरण तिसरे

मूळ पुढे सुरू 

                 ज्यांनी माझी तृष्णा जाणली होती ते उन्नत आत्मे होते. 
                 माझे भाव व्यक्त करण्यासाठी मी माझ्या वह्यांमध्ये व भिंतींवर कृष्णाला पत्रे लिहीत असे. संपूर्ण रात्र मी कृष्णासाठी रडून घालवत असे. एका गीतामध्ये मी लिहिले आहे - 
कान्हा तुझे नीलरूप पाहता लोचनी 
अन्य विचार ना येती मनी 
तुझे प्रिय दिव्य चरण 
तर छेडीति मम हृदयाची 

तुझे मनमोहक स्मित 
मंत्रमुग्ध करी मम जीवास 
तुझ्या नीलसौंदर्याचा आस्वाद 
ही तर स्थिती मुक्तिसदृश

तुझ्या मधुर संगीताने 
न्हाऊन निघे हे विश्व 
शब्दातील सच्चिदानंदात 

                  माझा हा अखंड धावा ऐकून कृष्णाने प्रतिसाद दिला. मला अनेक अनुभव आले, अनेकदा कृष्णाचे दर्शन झाले. 
                  एकदा कृष्णाने आपले गुपित उघड केले, " पुट्टपर्तीमधील सत्यसाई म्हणजे मीच आहे" ह्या प्रकटनामुळे माझ्या जीवनाला महत्वपूर्ण कलाटणी मिळाली. तो दिवस होता ८ जुलै १९८५. 