ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्य हे सत्यस्वरूपात अस्तित्वात असते."
प्रकरण तिसरे
मूळ पुढे सुरु
जर एखाद्याने तुम्हाला विचारले, " तुम्ही कधी आलात ?" तर त्यावर मी कधी आलो ? माझे मूळ स्थान कोणते आहे ? परमेश्वराचे वास्तव्य असलेल्या माझ्या मूळस्थानाशी मी परत कसा जाऊ ? तुमच्या मनामध्ये अशी विचारप्रक्रिया सुरु व्हायला हवी. सुरुवातीला जरा हे कठीण वाटेल, परंतु सरावाने ते अंगवळणी पडेल आणि पडायलाच हवे.
प्रवास करताना तुम्ही रस्त्यावरच्या पाट्या वाचत असाल, उदा. तुम्ही ' शंकर शक्ती सिमेंट ' अशी पाटी पाहिलीत तर तुम्ही मनात भगवान शंकर आणि पार्वती देवी यांच्याविषयी विचार केला पाहिजे. जर तुम्ही मथुरा शब्द वाचलात तर कृष्णाविषयी विचार करा. जर वसंत आणि कंपनी अशी पाटी वाचलीत तर वसंतसाई मंत्राचा विचार करा.
अशातऱ्हेने मी माझ्या दिनचर्येमध्ये आणि नित्य कर्मांमध्ये गर्भितार्थ शोधत असते. तुम्हीही तुमची सर्व नित्यकर्मे परमेश्वराशी जोडून प्रेमभावे करा आणि कर्मफलाची अपेक्षा न ठेवता त्यालाच अर्पण करा. या कार्यप्रणालीतून अन्नामध्ये, घरामध्ये, गावामध्ये तसेच देशामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रेमस्पंदने पसरतात.
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा