ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर हाच एकमात्र गुरु आहे."
प्रकरण तिसरे
मूळ पुढे सुरु
ॐ
थोडक्यात सांगायचे तर २४ तास परमेश्वराचे पूजन चिंतन हेच खरे माझ्या जीवनाचे सूत्र. या ' मी विना मी ' ला साईस्वरूप प्राप्त करून देणाऱ्या गेल्या ३५ वर्षांच्या माझ्या तपाची व साधनेची ही छोटीशी झलक आहे. तोड - जोड
लहानपणापासूनच मला एक सवय आहे. मी जे जे काही पाहते ते मी परमेश्वराशी जोडते. गृहस्थधर्म पाळत असताना मी या सवयीचा उपयोग करून घेतला. घरातील सर्व कर्तव्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मी परमेश्वराशी जोडल्या. उदा. दरवाजा पाहिला की माझ्या मनात येत असे, की हा काही साधारण दरवाजा नाही हा स्वर्गाचा दरवाजा आहे. खिडकी पाहिली की विचार करत असे की ही माझ्या हृदयाची खिडकी आहे, ज्यामधून मी परमेश्वराचे दर्शन घेऊ शकते. झोपाळा मला राधाकृष्णाची आठवण करून देत असे व मी अशी कल्पना करत असे, की ते माझ्या हृदयात झोके घेत आहेत. अशातऱ्हेने आपण पहात असलेले सर्व काही परमेश्वराशी जोडू शकतो.
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा