गुरुवार, १४ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " संयम आणि एकाग्रमन याद्वारे मनामध्ये सुविचार व सद् भावना निर्माण होतात."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

* तोंड धुताना व दात घासताना मी भिंतीवर लावलेल्या गीतेतील श्लोकांवर चिंतन करत असे. महात्मा गांधींची ही सवय मी आत्मसात केली. 
* ३ वाजून ४० मिनिटांनी मी प्रार्थनागृहात जाऊन ध्यान करत असे.
* सकाळच्या ध्यानानंतर मी देवदेवतांच्या तसबिरींपुढे उभी राहून पूजा प्रार्थना करत असे. आमच्या घरात श्री रंगनाथाचे खूप फोटो होते. मी त्यांना प्रार्थना करत असे की मलाही आंडाळसारखे सदेह साईरंगामध्ये विलिन व्हायचे आहे. मी श्रीकृष्णाच्या फोटोपुढे उभी राहून, त्यांनी त्यांच्या राधेचा स्वीकार करावा अशी आर्जवपूर्वक त्यांची प्रार्थना करत असे. गांधीजींच्या फोटोसमोर उभी राहून त्यांनी मला माझ्या दोन नेत्रांप्रमाणे असणारी अहिंसा व सबुरी द्यावी अशी प्रार्थना करत असे . रामकृष्णांच्या फोटोसमोर उभी राहून मी त्यांना प्रार्थना करते असे की त्यांनी माझ्या सुख आणि धन याविषयी असणाऱ्या आसक्तीचा नाश करावा. 
* श्री  आंडाळच्या फोटोपुढे उभी राहून मी म्हणत असे " तुम्ही माझ्या जीवनाचा आदर्श आहात. तुमच्यासारखे मलाही सदेह परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचे आहे. तुम्ही मला असा वर द्या."
* माझी नित्यप्रार्थना करताना मी म्हणत असे " या जगातील समस्त जीव, चराचर सृष्टी, ज्ञानी, भक्त, मुक्त, जीवनमुक्त, चिरंजीवी, सिध्दपुरुष आणि सर्व देवदेवतांनो मी तुमच्यापुढे नतमस्तक होते. याचबरोबर मी दररोज गायत्री मंत्राचा जपही करत असे. एखादेवेळेस मी जरी विसरले तरी आपोआप या प्रार्थना माझ्या ओठांवर येतात. इतके ते स्वाभाविक बनून गेले आहे. केवळ सरावानेच चांगल्या सवयी अंगी बाणवल्या जाऊ शकतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा