रविवार, १० जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

               " दर दिवसागणिक आपले आयुष्य कमी कमी होत आहे. परमेश्वरप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही काही करणार नाही का? "

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

                   त्यानंतर २३ जानेवारी १९८४ रोजी मदुराईमधील गांधी म्युझियम येथे मला स्वामींचे पहिले दर्शन झाले. म्युझियममध्ये काम करणाऱ्या माझ्या वडिलांच्या मित्राने आम्हाला स्वामींच्या भेटीविषयी माहिती दिली. मला अत्यानंद झाला. मी माझे वडील व पती स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. दुर्दैवाने मी स्वामींपासून खूपच दूर अंतरावर होते. मला स्वामींना नीट पाहतासुद्धा आले नाही. त्यामुळे मी निराश झाले. तरीपण आम्हाला सकाळी अर्धा तास स्वामींचे दर्शन होऊ शकले. २९ जून १९८५ - मी दीड वर्षानंतर पुट्टपर्तीला गेले आणि स्वामींचे दर्शन घेतले !

अहोरात्र परमेश्वराच्या संगतीत 
                   ज्या माझ्या ३५ वर्षाच्या दिनचर्येनी मला परमेश्वराच्या चरणाप्रत नेले, ती दिनचर्या मी वाचकांसाठी खाली देत आहे. ती त्यांना नक्कीच सहाय्यभूत ठरेल. 
* मी दररोज पहाटे ३ वाजता उठत असे व करदर्शन घेऊन प्रार्थना करत असे, ' हे दोन्ही हात सदैव देते असावेत, कधीही घेते नसावेत.'
* उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी मी पृथ्वीमातेला प्रणाम करून तिची प्रार्थना करत असे व तिला पायदळी तुडवल्याबद्दल तिची क्षमा मागत असे. 
* त्यानंतर मी ' दिनम् दिनम्  श्रीरंग दर्शनम  ' असे म्हणून उत्तरेकडे सात पाऊले टाकून श्रीरंगाला प्रणाम करत असे. ' तसेच दिनम् दिनम् पुट्टपर्तीदर्शनम ' म्हणून पुट्टपर्तीच्या दिशेने सात पाऊले टाकून प्रणाम करत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा