रविवार, २४ जुलै, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " योग्य वेळ येताच परमेश्वर कवच तोडून आपल्याला मुक्त करेल."

प्रकरण तिसरे 

 मूळ पुढे सुरु 

* गृहकृत्ये  करताना मी प्रत्येक कर्म परमेश्वराशी जोडत असे. केर काढताना मी मंदिराचा केर काढते आहे असा विचार करे. भांडी घासताना पूजेची उपकरणी घासते आहे अशी कल्पना करे. मुलांसाठी वेळ देताना मी भगवान श्री कृष्णाच्या मुलांसाठी वेळ देत आहे असे समजत असे. कामाचा कितीही बोजा असला तरी मी माझी ध्यानाची वेळ कधीही चुकवली नाही. कधीही त्यामध्ये तडजोड केला नाही वा वेळेत बदल केला नाही. 
* गेली अनेक वर्षे मी सकाळी विष्णुसहस्रनाम व स्वामी सहस्त्रमनाम  म्हणत असे आणि संध्याकाळी पुन्हा विष्णुसहस्रनाम म्हणत असे. प्रवासामध्ये असताना बसमध्ये बसल्या बसल्या मी विष्णुसहस्रनाम म्हणण्यास सुरुवात करत असे. 
* दुपारी १२ वाजता मी प्रार्थना गृहात जाऊन ध्यान करत असे. 
* पुन्हा संध्याकाळी ४ वाजता प्रार्थना गृहात जाऊन ध्यान करत असे व त्यांनतर भजन, अष्टोत्तरम्  आणि आरती करत असे. 

उर्वरित मजकूर पुढील भागात..... 

जय साई राम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा