ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" खऱ्या अर्थाने परमेश्वराचा शोध घेणाऱ्यांना सिद्धी नको असतात कारण सिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे होय."
प्रकरण तिसरे
मूळ पुढे सुरू
माझे भाव व्यक्त करण्यासाठी मी माझ्या वह्यांमध्ये व भिंतींवर कृष्णाला पत्रे लिहीत असे. संपूर्ण रात्र मी कृष्णासाठी रडून घालवत असे. एका गीतामध्ये मी लिहिले आहे -
कान्हा तुझे नीलरूप पाहता लोचनी
अन्य विचार ना येती मनी
तुझे प्रिय दिव्य चरण
तर छेडीति मम हृदयाची
तुझे मनमोहक स्मित
मंत्रमुग्ध करी मम जीवास
तुझ्या नीलसौंदर्याचा आस्वाद
ही तर स्थिती मुक्तिसदृश
तुझ्या मधुर संगीताने
न्हाऊन निघे हे विश्व
शब्दातील सच्चिदानंदात
एकदा कृष्णाने आपले गुपित उघड केले, " पुट्टपर्तीमधील सत्यसाई म्हणजे मीच आहे" ह्या प्रकटनामुळे माझ्या जीवनाला महत्वपूर्ण कलाटणी मिळाली. तो दिवस होता ८ जुलै १९८५.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा