ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देह, मन, बुद्धी, इंद्रिये आणि अहंकार रहित प्रेम शुद्ध आणि सत् चितआनंद स्वरूप आहे. त्याचे सार मनुष्याच्या आकलनापलीकडचे आहे. "
प्रकरण एकोणीस
दिव्य व्याधी
माझ्या त्वचेला अॅलर्जीमुळे कंड सुटते. गेली १५ वर्षे मला हा त्रास होत आहे. यासाठी मी कोणत्याही डॉक्टरकडे गेले नाही. जेव्हा स्वामींसाठी व्याकुळ होऊन मी रडत असते, तेव्हा मला अधिकच त्रास होतो. स्वामींच्या विरहामुळे मी करुण विलाप करत असते. आणि माझा देह माझ्या प्रेमाचा आवेग सहन करू शकत नाही. माझ्या देहावर त्यामुळे परिणाम होतो. त्यासाठी भक्त मला तऱ्हेतऱ्हेची क्रीम, तेलं वगैरे आणून देतात. तरीसुद्धा कशाचाच उपयोग होत नाही.
२७ मे २००३ ला मी मुक्ती निलयमला येईन, असे स्वामी म्हणाले परंतु ते आले नाहीत. २७ मे २००३ ते २७ मे २००४ या कालखंडामध्ये स्वामी आणि मी सतत शारीरिक व्याधींनी ग्रासलो होतो. स्वामी म्हणाले की ते सर्व वैश्विक मुक्तीसाठी होते. वैश्विक मुक्ती म्हणजे लोकांच्या कर्मांचा (यामध्ये पाप आणि पुण्य दोन्ही आले ) संहार. सर्व कर्मांची ओझे दूर हटवण्यासाठी स्वामींनी आणि मी ती कर्म आमच्या देहावर घेऊन भोगली. जून २००३ मध्ये स्वामी पडले व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना चालताही येत नव्हते. त्यानंतर त्यांनी सांगितले, की त्यांच्या एका डोळ्यात रेटिनाच नाहीये. ऑगस्ट महिन्यात पुट्टपर्तीत ते पुन्हा पडले. ४ मे रोजी त्यांच्या हातावर एक विट पडून हाताचे हाड मोडले. डॉक्टरांनी स्वामींचा हात स्लींगमध्ये घातला. त्याचे विद्यार्थी त्यांना व्हीलचेअरवर बसवून दर्शनासाठी घेऊन येत. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते ते !
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम