रविवार, ६ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होतो हे महत्वाचे आहे."

प्रकरण एकोणीस 

दिव्य व्याधी

           माझे प्रियतम भगवान यांच्या दिव्य चरणी,
कोटी कोटी प्रणाम !
              स्वामी, गेल्या चार दिवसांपासून माझी पाठ दुखतेय. घरातील सर्व कामे मला एकटीलाच करावी लागतात. पायलाही खूप कंड सुटते आहे. दृष्टी अधू असल्यामुळे काम करताना मला अगतिक वाटत आहे, चिंता आणि ताण जाणवत आहे. मी काल रात्री तुमच्या पाशीरडले. " कितीही मोठा आजार असला तरी मी कुठल्याही डॉक्टरांकडे जाणार नाही." स्वामी, माझ्या या निर्धाराशी ठाम राहण्यासाठी माझ्यावर कृपा करा. स्वामी, माझ्या छातीत दुखतंय, हे तुमच्याशिवाय मी कोणाला सांगू ? स्वामी ! तुम्ही माझ्यावर ब्रम्हास्त्र सोडले आहे. मी अगतिक आहे. त्याला औषधरुपी शस्त्राने प्रतिकार करण्याची शक्ती माझ्याकडे नाही. मी स्वसंरक्षण करण्यास असमर्थ असल्यामुळे मी ब्रम्हास्त्रापुढे मन तुकवते. ही जर तुमचीच इच्छा असेल तर मी तिचे स्वागत करते. हे कृपादान माझ्यासाठी शाप ठरेल का वरदान ? हे मला माहित नाही. तरीपण स्वामी, प्लिज माझ्यासाठी एक गोष्ट करा, इतरांनी माझी रुग्ण म्हणून सेवा करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. लोकांना माझ्याविषयी अनुकंपा वाटावी, असे जीवन मला जगायचे नाही. मला कोणाकडूनही सेवा वा मदत घ्यायची नाही. तर मीच इतरांची सेवा करायला हवी. दुसऱ्यांच्या मदतीची प्रतीक्षा करणारा असहाय्य रुग्ण बनण्यापेक्षा मृत्यू आलेला चांगला. 
            स्वामी, भगवान तुमच्याशिवाय मला अन्य कोणतेही आश्रय स्थान नाही. 
            तुमचे दिव्य नामच माझ्यासाठी औषध बनू दे.

तुमची लाडकी लेक 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा