गुरुवार, १७ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मनुष्य सिद्धिंद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो."

प्रकरण एकोणीस 

दिव्य व्याधी 

             " हे करुणामया, तुम्ही समस्त जागाच्या कर्मांचा हिशोब तुमच्या अंगावर घेतला आहे. त्यामुळे आज तुमची ही अवस्था झाली आहे. मला जर हे आधी माहित असते, तर मी तुमच्याकडे कधीच वैश्विक मुक्तीचा वर मागितला नसता." माझे अश्रू थांबतच नव्हते, थांबतच नव्हते. 
             माझ्या सर्वांगाला खाज सुटली होती. रात्रभर मी जागीच होते. माझ्या दोन्ही हातांवर फोड उठले होते. माझी त्वचा फणसाच्या सालीसारखी दिसत होती. हातापायाच्या फोडांमधून द्राव स्त्रवत होता. 
ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही स्वतःला बरं करा आणि मलाही बरं करा. 
स्वामी - हे आपले अवतार कार्य आहे. वैश्विक मुक्तीसाठी हे सर्व आपण आपल्या अंगावर घेतले आहे. गेल्या २७ मे पासून आतापर्यंत आपल्याला जास्तच त्रास होतो आहे. या २७ मे पासून हळूहळू सर्वकाही ठीक होईल. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा