बुधवार, २३ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती पाचवा 
 
३ जून २००७ ध्यान 
वसंता - स्वामी, साई गीता ऋषी होती का असे एका  भक्तानी विचारले. 
स्वामी - नाही, ती ऋषी नव्हती, पण कामदेवाचा अंश होती. तुझ्यापासून मी विलग झाल्यानंतर ४६ वर्षे मी कामदेवाला माझ्या नियंत्रणात ठेवले. पूर्वी तू कामदेवाची आराधना करून, त्याला माझ्याकडे दूत म्हणून पाठवलेस. मी विचलित झालो नाही. ह्यावर्षी देव, ब्रम्हा आणि शिवा ह्यांनी मला कामदहन करण्यास भाग पाडले. कामदहनानंतर आपला विवाह संपन्न होईल. साई गीता २२ मे ला मृत्यु पावली. २३ मे ला वसंत साई मंत्राचा जन्मदिन. नवनिर्मितीसाठी तो शब्द ब्रम्ह प्रणव नाद आणि विराटपुरुषाचे रूप आहे. नवनिर्मितीसाठी दिनांक २७ हा आपला विवाह दिन आहे.           
              स्वामींचा आणि माझा जन्म दिनांक २३ आहे. कामदेवाला स्वामींनी ४६ वर्षे त्यांच्या नियंत्रणात ठेवले. २३ + २३ = ४६. ही संख्या सत्ययुगातील नवनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ४६ गुणसूत्रांचे प्रतिनिधित्व करते. माझा ज्या रुपाशी विवाह झाला त्या रूपातून १९६१ साली स्वामींचे दिव्यत्व बाहेर पडले. व त्यांनंतरच मी तीव्रतेने परमेश्वराचा शोध घेऊ लागले. १९६२ साली साईगीता स्वामींकडे आली. व ४६ वर्षानंतर दिनांक २२ मे २००७ रोजी तिने देहत्याग केला. साईगीताचा मृत्यू कामदहनाचे प्रतीक असल्याचे स्वामींनी सांगितले. २३ मे १९९८ रोजी स्वामींनी ' ॐ श्री साई वसंत साईसाय नमः ' हा वसंतसाई मंत्र प्रकट केला. हा शिवशक्ती मंत्र आहे असे स्वामींनी सांगितले. हे स्वामींच्या आणि माझ्या संयोगाचे प्रतीक असून परमेश्वराच्या विराट पुरुष रूपाचे प्रतिनिधित्व करते. स्वामींचा आणि माझा जन्म दिनांक २३ आहे. तसेच वसंतसाई मंत्राचा जन्मदिनांक २३ आहे. आलींगन अवस्थेतील नर आणि नारी हे परमेश्वराचे विराटपुरुष रूप होय . हे रूप विभागते आणि निर्मितीस प्रारंभ होतो. नवजीवनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी २३ नर गुणसूत्रे व २३ नारी गुणसूत्रे ह्यांच्या संयोगाचे प्रतीक म्हणजे विराटपुरूष रूप. जसे सूरपद्माचा वध करण्यासाठी शिव पार्वतीच्या संयोगाद्वारे सुब्रमण्यमचा जन्म झाला, तसा कलियुगाचा अंत करण्यासाठी नवनिर्मिती, सत्ययुग जन्मते आहे. 
             जीव शिवापासून विलग झाला. ४६ वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. साई गीताचा मृत्यू साई शिवाच्या कामदहनाचे पूर्णत्व दर्शवतो. 

..... 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' शिव शक्ती प्रिन्सिपल  ' ह्या पुस्तकातून 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा