ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
प्रकरण एकोणीस
दिव्य व्याधी
" हे कसं शक्य आहे ?" असे उपहासाने म्हणू नका कारण खरंच हे घडले आहे. भगवद्गीतेतील ' अनन्यश्चिन्तयन्तो... ' या श्लोकात असे नमूद केले आहे की, जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्यांचा योगक्षेम मीच पाहतो. माझी हीच अवस्था आहे. मी केवळ परमेश्वराचेच चिंतन करते. म्हणून माझ्या सर्व व्याधी दिव्य बनल्या. माझे जीवन म्हणजे गीतेचे प्रात्यक्षिक आहे. वसंतमयम, रिक्त, संस्कार शस्त्रक्रिया, विश्वगर्भ आणि युद्धासाठी सुसज्ज हे सर्व ' उपनिषदांपलीकडचे सत्य ' आहे आणि सत्ययुगाचा पाय आहे. जसा मी जगासाठी विलाप केला तसा कोणी करेल का ? कोणीही करणार नाही आणि म्हणूनच जग मला समजूशकणार नाही.
* * *
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा