रविवार, २० मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " जर आपण अत्यंत एकाग्रतेने एखादी गोष्ट मागितली तर वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्याचे उत्तर मिळते."

प्रकरण एकोणीस 

दिव्य व्याधी

              १ जूनपासून स्वामींनी स्वतःला बरं करायला सुरुवात केली. ७ जूनला ते पुट्टपर्तीला गेले. त्यांनी मला कोईमतूरला जाण्यास सांगितले. ते म्हणाले, " तू पूर्ण बारी झाल्यानंतर मुक्ती निलयमला जा. " मी २३ दिवस कोईमतूरला राहिले. गेले १२ महिने त्रास, दुःख  अश्रू याशिवाय दुसरे काही नव्हते. आता ते संपले आहे. कोईमतूरला असताना मी खूप आनंदात होते. स्वामी रोज मला संदेश पाठवत होते. तेथील प्रेमळ भक्तांच्या प्रेमापुढे मी माझा सर्व त्रास विसरून गेले. 
              २७ मे  नंतर माझी आणि स्वामींची तब्येत कशी सुधारली, ते आता आपण पाहू या.

       दिनांक 
      स्वामी 
       वसंता 
 २७/५/२००४
 * स्वामी व्हीलचेअरमध्ये आहेत. 
* पायावरील वाहणाऱ्या जखमांमुळे मी चालू शकत नाही. 
 २८/५/२००४
* स्वामींनी त्यांचा उजवा हात थोडा वर उचलला. 
* तापाने फणफणलेली अंगदुखी, संपूर्ण शरीरावर फोड आणि गळवे. स्वामींनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितला आणि मी औषधे घेऊ लागले. 
 २९/५/२००४
* स्वामी त्यांच्या हाताची जास्त हालचाल करतात. 
* दुपारी  ताप उतरला. अंगदुखी थांबली व गळवेही थोडी कमी झाली. 
 ३०/५/२००४
* स्वामींनी त्यांचे दोन्ही हात चांगले वर उचलले. 
* सूज नाही. कंड नाही. आधार घेऊन मी चालू लागले. संध्याकाळी दर्शनाला गेले. 
 ३१/५/२००४
* स्वामींनी त्यांच्या उजव्या हातानी तोंड पुसले. 
* मी पण बारी आहे आणि माझी त्वचा पूर्ववत झाली. 
 १/६/२००४
 * भजनांनंतर स्वामी हळूहळू उठले आणि दोन चार पावले चालले. 
 * मी पूर्ण बरी झाले. मी आता नेहमीसारखी चालू शकते. एवढ्या लवकर बरी झाल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. 
 २/६/२००४
 * स्वामी सकाळच्या आणि संध्याकाळच्या दर्शनाच्या वेळेस काही पावले चालले. 
* प्रकृतीत खूपच सुधारणा, त्वचेला तिचा नैसर्गिक रंग यायला सुरुवात झाली. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा