ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरमध्ये समरस झालेला मनुष्य केवळ एकच गोष्ट जाणवतो - परमेश्वर, परमेश्वर आणि परमेश्वर !"
प्रकरण
ऐकोणीस
दिव्य व्याधी
" सर्वकाही सत्यप्रसाद आहे "
व्याधी कशा काय दिव्य होतात ? याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. गेल्या अनेक वर्षात अनेकानेक व्याधींची पीडा व दुःख याद्वारे स्वामींनी माझी कसोटी घेतली आहे. कधी दातदुखी, पोटदुखी, कानदुखी तर कधी नेत्रविकार. अशा प्रकारे स्वामींनी माझ्या प्रत्येक अवयवाला यातना भोगायला लावल्या. तथापि माझी प्रत्येक व्याधी, पीडा दिव्य बनली. एक दिवस मला तीव्र दातदुखीचा त्रास होत होता. माझा चेहराही सुजला होता. मी स्वामींना म्हणाले," स्वामी, आज मी ऊस खाणार आहे पण मला दुखणार नाही ! " आणि ऊस खाताना मला खरंच अजिबात दुखलं नाही. हिरड्यांना सूज असूनही मला वेदना झाल्या नाहीत. अशातऱ्हेने माझ्या प्रत्येक व्याधीमध्ये दिव्यत्वाने प्रवेश केला. माझी स्थिती वर्णन करणारी अनेक पत्रे मी स्वामींनी लिहिली. ११ जून १९८८ रोजी लिहिलेले एक पत्र मी खाली देत आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा