ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जीवन कसे जगावे ? हे आपल्या हातात आहे. परमेश्वराच्या नव्हे."
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
विश्वामित्र नाडी, जी कौशिक नाडी म्हणूनही ओळखली जाते त्यामध्ये माझ्या प्रेमाचे वर्णन ' आगळे -वेगळे प्रेम ' असे केले आहे . मी स्वामींना विचारले की , या प्रेमात आगळे वेगळे असे काय आहे ? स्वामींनी मला एक दृश्य दाखवले.
दृश्य
स्वामी म्हणतात,
" तू विचारतेस,
' या प्रेमाचे आगळे-वेगळेपण कशात आहे ?'
हे प्रेम वर्णनातीत आहे.
जर कोणी त्याचे वर्णन करावे
तर ते त्याला ज्ञात नाही
जर ते त्याला ज्ञात असेल
तर ते वर्णनातीत आहे.
जर त्याला प्रेम- ज्योती म्हणावे
तर ते रूपात बद्ध होते
जर त्याला प्रेमाचा महासागर म्हणावे
तर त्याला किनारा आहे.
जर त्याला प्रेमाचे अंतरीक्ष म्हणावे
तर ते नामात बद्ध होते.
मग याचे वर्णन करावे तरी कसे ?
कौशिक ऋषींनी काय पाहिले?
काय जाणिले ?
त्यांनी त्या प्रेमा कसे संबोधले ?
गरुडा ! कौशिकास तू घेवोनी ये.
कौशिका ! हिच्या प्रेमाचे आगळे -वेगळेपण आहे कशात ?
कौशिक म्हणतात .....
" स्वामी, दूरवरून मी एक छोटासा ठिपका पाहिला.
प्रभू, कृपया क्षमा करा मज,
चूक झाली माझी
हे प्रेम शब्दात वर्णू शकत नाही मी
म्हणून मी म्हटले 'आगळे वेगळे '
तुम्ही प्रेमधार आहात
स्वामी म्हणतात,
" विश्वामित्रा, जर तुम्ही विश्वाचे मित्र नसता
तर तुम्हाला तो ठिपकाही दिसला नसता
विश्वाचे मित्र तुम्ही म्हणून तो ठिपका दिसला तुम्हा.
तो ठिपका व ब्रम्ह दोन्ही सारखेच ! वर्णनातील.
तुम्ही पाहिलेल्या ठिपक्याविषयी सांगा जगाला."
(त्यानंतर स्वामी माझ्याकडे पाहत म्हणतात.)
" हे प्रियतमे, तू पाहिलेस का ?
मी तुझ्या प्रेमाचा आधार
आधार, अधेय, अवतार, आचार.
सर्व काही प्रेम आहे.
या प्रेमाच्या आधारास.
तुझे प्रेम जाणून घेण्या
सहस्त्रजन्म हवेत घ्याया
आपण एक काम करू
दे तुझे संपूर्ण प्रेम तू मला
आणि सत्य घे माझे,
होऊन प्रेमसाई मी
घेईन अनुभूती तव प्रेमाची
तदनंतर विशद करू शकेन मी
प्रेम होऊनी विस्तारेन मी अखिल विश्वात
अनुभव घेण्या प्रविष्ट होईन प्रत्येकात
तदनंतर सांगेन मी प्रेम काय चीज आहे
कौशिकाने अचूक सांगितले ' आगळेवेगळे '!
नाम देणे शक्य नाही, या आगळ्या वेगळ्या प्रेमास.
ना आदि ना अंत ' या प्रेमास '."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा