ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प सव्वीस
मधुरम्
संत तिरुवल्लुवर म्हणतात,
जेव्हा मधुर शब्द उपलब्ध असतात तेव्हा कठोर शब्दांचा वापर का करायचा ? हे म्हणजे परिपक्व फळ उपलब्ध असताना कच्चे फळ खाण्यासारखे आहे.
आपण मधुर शब्द वापरले पाहिजेत. जेव्हा आपण मधुर शब्द वापरतो तेव्हा आपल्या अंतर्यामी आनंदाचे झरे वाहू लागतात आणि ऐकणाराही आनंदात न्हाऊन निघतो. याउलट जर कठोर शब्दांचा वापर केला तर बोलणारा व ऐकणारा दोघांसाठीही ते सुखकारक नसते. त्या शब्दांनी वातावरण प्रदुषित होते.
प्रथम आपले भाव मधुर असायला हवेत तर आपले विचार मधुर होतात व त्यानंतर आपले शब्द मधुर होऊन ऐकणाऱ्याला माधुर्य प्रदान करतात. वारा ह्या शब्दांमधील माधुर्य वाहून नेतो व त्या माधुर्याने अंतरिक्ष व्यापून टाकतो. अशा तऱ्हेने अंतरिक्ष, हवा व सभोवताल शुद्ध होतो.
शब्दांचा उच्चार मुखाने केला जातो. मुख आणि जलतत्त्व एकमेकांशी सल्लग्न आहेत. आपण मधुर शब्द बोलल्याने जल शुद्ध होते. जर आपले भाव, विचार आणि शब्द मधुर बनले तर आपली कार्य मधुर होतील. आपले प्रत्येक कार्य मधुर बनेल. आपल्याला हे कसे समजेल ? जर तुमच्या कार्यामुळे तुम्हाला आणि इतरांना माधुर्य प्राप्त झाले तर आपल्याला समजते की ते मधुर आहे. याउलट जर आपल्या कार्यामुळे आपल्याला आणि इतरांना दुःख मिळाले तर आपल्याला समजते आपल्या कर्मांमध्ये माधुर्य नाही.
कृतीमधील माधुर्यातून मधुर कृती (स्वभाव ) बनते. प्रत्येक गोष्ट सद्गुणांनी व्याप्त होते. जेव्हा आपल्यामध्ये वास करणारा आत्मा इतरांमध्येही विद्यमान असल्याचा आपल्याला बोध होतो तेव्हा माधुर्य आपली स्थायीभाव बनतो.
जर तुमचा स्वभाव मधुर असेल तर जेथे जेथे तुम्ही जाल, ज्यांना ज्यांना भेटाल तुम्हाला माधुर्याची अनुभूती येईल. ह्या माधुर्यात इतरांना सहभागी करून घेतल्याने आनंदाचा लाभ होतो. जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा त्यांनी एकमेकांशी माधुर्याने संभाषण केले तर माधुर्याची अनुभूती होऊ शकते. ह्या माधुर्यात सर्वांना सहभागी करून घ्या व अधिक आनंदाचा लाभ घ्या. हृदयाचे माधुर्य व भावमाधुर्य सर्वांसमवेत वाटून तुमच्या मनात माधुर्य आहे का हे तुमच्या शब्दांमधून प्रतीत होईल.
जर तुम्ही ' सर्वांना प्रेम देणे ' हे तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट बनवले तर तुमचा स्वभाव मधुर बनेल व ह्याचा अखिल विश्वास लाभ होईल. तुम्ही कर्म,वर्तन सर्वकाही मधुर बनेल. परिणामतः पंचतत्त्वांची शुद्धी होईल. कठोर शब्द आणि कृतींमुळे पंचतत्वे प्रदुषित झाली आहेत आणि निसर्गाचा कोप होण्यासही कारणीभूत आहेत. चला तर मग आपण आजपासून माधुर्याचा अंगिकार करू. प्रेम म्हणजे माधुर्य बाकी सर्व कटु आहे. जर आपण प्रेमाची कास धरली तर विश्व पावन होईल.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' The Establishment of Prema ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा