शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री संदेश 

तत्वमसि 

              ' तत्वमसि ' ह्या महावाक्याचा अर्थ तू ते आहेस. तू कोण आहेस ? तू देह वा मन वा नाम वा रूप वा इन्द्रिये वा बुद्धी आहेस का ? ह्या प्रश्नाचा मागोवा घेतल्यावर असे लक्षात येते की तुम्ही ह्यापैकी कोणीही नाही. तुम्ही भाव आहात. जन्मापूर्वी भाव रूपाविना आकाशामध्ये व्याप्त असतात. ते योग्य पात्र, वेळ, स्थान आणि पालक ह्याचा शोध घेतात. एकदा का भावांना योग्य पात्र मिळाले की आत्मा त्यामध्ये प्रवेश करतो. त्यावेळेस भावांना जीवन प्राप्त होते व ते नामरूपासहित पृथ्वीवर जन्म घेतात म्हणून ' मी कोण आहे ? ' ह्या प्रश्नाचे उत्तर ' मी भाव आहे ' असे आहे. 
               ' तुम्ही ते ' आहात. ' ते म्हणजे कोण? ' ते म्हणजे ' परब्रह्मन ' ना ते नर आहेत ना नारी. म्हणून आपण त्यांना ते म्हणतो. परब्रह्मन कोठे आहे. तुमच्या अंतर्यामी आहे जेव्हा तुमचे भाव रूप धारण करतात तेव्हा परब्रह्मन त्यांना जीवन देतो त्यास आत्मनिवासी म्हणतात. तो प्रत्येकामध्ये व प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यमान आहे. तो नसेल तर जीवन नाही. प्राणशक्तीद्वारा तो निराकारास आकार देतो. 
            आपण आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परब्रम्हाशी एकत्व पावले पाहिजे. हेच ' तत् त्वम् आसि ' होय. ही अवस्था कशी प्राप्त करायची ? आपले भाव सतत त्या आत्मनिवासीवर केंद्रित असायला हवेत व कार्य केवळ त्याच्या भोवती असायला हवे. 
             सुरुवातीला आत्मनिवासी ब्रह्मन् साक्षी भावात असते. जेव्हा मनुष्याचे कार्य मनाच्या आदेशानुसार चालते तेव्हा ते साक्षी भावाने अवलोकन करते. तथापि एक दिवस जीव जागृत होतो व माझ्या जीवनाचा उद्देश्य काय ? माझ्या जिवाला खरा अर्थ आहे का ? असा विचार करू लागतो. अशावेळेस अंतर्यामी जीवाचा जागृतीस सहाय्य करण्यासाठी येतो व त्याला साधनेच्या मार्गावर प्रोत्साहित करतो. काहीवेळा जीवास त्या मार्गावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे तो नाउमेद होतो व मदतीसाठी प्रार्थना करतो. आत्मनिवासी त्याच्या मदतीस धावून येतो व साधना चालू ठेवण्यासाठी त्याला सहाय्य करतो. जीव कृपा अर्जित करतो व अधिक साधना करतो. कर्मफलांचा त्याग करून तो म्हणतो," मी कर्ता नाही तूच कर्ता करावित आहेस आनंदही तूच घे." अशा तर्हेने जेव्हा जीव त्याचे व्यक्तित्व पूर्णपणे शरणागत करतो तेव्हा त्याला ' महेश्वरा ' अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेत तुम्ही ' ते ' बनून जाता. म्हणजेच जीव शिव बनतो. 
*     *     *

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' शिव शक्ती तत्व ' ह्या पुस्तकातून. 



जय साईराम   
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा