गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " प्रत्येकाच्या वैयक्तिक आकलनानुसार सत्याचे प्रकटीकरण होते. "

भाग - आठवा

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये 

               एका बाजूला मी ईशस्थिती दर्शवणारी ब्रम्हसूत्र, योगसूत्र, प्रेमसूत्र, शांतीसूत्र अशी पुस्तके लिहिते तर दुसऱ्या बाजूला मी म्हणते, " मला हे नको, मला फक्त स्वामी हवेत." मी विलाप करते आणि घाबरी होते. छोटेसे कोंबडीचे पिल्लू घाबरून कोंबडीच्या पंखाखाली लपून बसते, बाहेर येत नाही. त्या पिल्लासारखीच या ' मी विना मी ' ची अवस्था आहे. मी नेहमीच भयग्रस्त असते आणि स्वामींच्या चरणाखालची धूळ म्हणून स्वतःला लपवते. हे भय का ? कारण मला वाटते हे सर्व मला स्वामींपासून दूर करेल. ही भीती सतत माझ्या मनात घर करून असते. याचसाठी मी प्रत्येक क्षणी माझे परीक्षण करते. माझ्या मनात एकही कुविचार येऊ नये यासाठी मी सदैव सतर्क असते. मला फक्त स्वामी हवेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा