ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा आपण अखंड ईश चिंतनात असतो तेव्हा तेथे देह भावाला थारा नसतो. प्रेम आपला देह बनून जाते. "
भाग - आठवा
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
मला सर्वांची भीती वाटते, मी नेहमी अश्रू ढाळते. जर अन्य कोणी माझ्याअवस्थेत असते किंवा माझ्या जागी असते तर ते कसे असते ? ते या शक्तींच्या सहाय्याने विशाल साम्राज्य उभारून त्यांचे सम्राट बनले असते. संपूर्ण जग त्यांच्या पायाशी आले असते. मला हे काही नको आहे, मला फक्त परमेश्वर हवा आहे. मी माझा ' मी ' स्वामींनी अर्पण करून रिक्त झाले. म्हणून या देहामध्ये मी विना मी कार्यरत आहे. हा देह या ' मी विना मी ' चे भाड्याचे घर आहे.
मी मागितलेले तीन वर स्वामी प्रेमसाई अवतारकाळात पुरे करतील. स्वामी म्हणाले," वयाच्या पाचव्या वर्षानंतर तुला कोणीही पाहू नये, तुझा देह कोणाच्याही दृष्टीस पडू नये असा वर तू मागितलास, यासाठी सत्ययुगामध्ये कोणालाही देहभाव नसेल. तुझ्या प्रसूतिकाळामध्ये मी तुझ्याजवळ असावे असा दुसरा वर तू मागितलास. सीता गर्भवती असताना वनामध्ये एकाकी जीवन जगात होती म्हणून मी तुझ्याजवळ असावे अशी तुझी इच्छा आहे. जगाचे अज्ञान दूर व्हावे अशी तुझी इच्छा आहे, नाहीतर त्रेतायुगातील धोब्याप्रमाणे लोक परमेश्वराच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतील. यासाठी सत्ययुगामध्ये कोणीही अज्ञानी असणार नाही. तुझे ब्लाऊज शिंप्याने शिवू नयेत, असा वर तू का मागितलास ? हा वर तुझे परमपातिव्रत्य दर्शवतो. सत्ययुगामध्ये संपूर्ण जगाकडे हा गुण असेल. तू मागितलेल्या या तिन्ही वरांचा गर्भितार्थ, तुला ' मी ' नसल्यामुळे माहीत नाही. ते योग्य रीतीने कसे मागावेत हेही तू जाणत नाहीस."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा