ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले भाव पूर्णतः परमेश्वरावर केन्द्रित असायला हवे.
आपण जे काही बोलतो,
आपण जे काही खातो,
आपण जे काही विचार करतो,
आपण जेथे जातो,
जर आपली दृष्टी परमेश्वरावर केन्द्रित असेल तर जग आपल्याला स्पर्श करणार नाही. "
भाग-आठवा
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
२००८ साली पुट्टपर्तीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी लिहिलेली कविता पुढे देत आहे -
अहो प्रिय स्वामी !
काहीही करू शकत नसाल जर तुम्ही,
कृपया, परत द्या मला माझा ' मी '
स्वतःच करेन मी सर्वकाही
चित्रवतीस करेन आवाहन जलप्रलयाचे
नसानसातून वाहणाऱ्या रक्तात माझ्या,
आहे अस्तित्व तुमचे
सामर्थ्य आहे माझ्या तपोबलात
या अपरिवर्तनीय विश्वाचा संहार करण्याचे
सर्वांस परिचित तुम्ही
नवनीत चोर म्हणूनी
परि ते न जाणती
चोरीला तुम्ही माझा ' मी '
सर्वांस ठाऊक, तुम्ही आहेत चित्तचोर
परि ठाऊक नाही त्यांसी
तुम्ही आहात ' मी ' चोर
अजब असे हे जगाकरिता
हे ' मी ' चोरा !
कृपया परत द्या मला माझा ' मी '
परत मिळता माझा ' मी '
साम्राज्ञीपद भुषवेन मी
देईन आज्ञा जलप्रलयाची चित्रवतीस
प्रलय होता,
होईल अंत विश्वाचा अन् वसंतकथेचा
दूर भिरकावेन मग माझा ' मी ' अन्
बनेन धूलिक मी तव चरणकमलांची, तव चरणकमलांची !
* * *
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा