ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भौतिक कल्पना आणि ज्ञान तोडून प्रत्येक गोष्ट दिव्य ज्ञानाशी जोडल्यास तुम्हाला परमेश्वराच्या वैश्विक रूपाचे दर्शन होईल."
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
स्वामींनी यासाठी पांडुरंगाचे मंदिरच का निवडले ? त्याऐवजी त्यांनी रंगनाथाचे वा कृष्णाचे मंदिर का नाही निवडले ? कारण जीवन केवळ कर्म करण्यासाठी आहे. जर आपण सर्व कर्मं कर्मयोग समजून केली तर ती आपल्याला बाधत नाहीत.
मी माझे प्रत्येक कर्म कर्मयोग समजून करते, त्यामुळे मी पुढील जन्मात फक्त परमेश्वरासमवेत राहणार आहे. पुढील जन्मातील सर्व कार्ये आम्ही एकत्रच करू. जगापुढे आदर्श जीवनशैलीचे उदाहरण मांडण्यासाठी हे सर्व घडले. " पांडुरंगाने आजवर अनेक भक्तांसाठी जे केले तसे पांडुरंग माझ्यासाठी काही करणार नाही का ?" ही आस माझ्या मनात सतत असते. ' साई गीता प्रवचनम ' या पुस्तकातील ' कर्मयोग ' प्रकरणात मी याविषयी सविस्तर लिहिले आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा