ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली तर तुम्ही परमेश्वरच होवून जाल. "
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
पृथ्वी कर्मभूमी आहे. कर्म करण्यासाठी आपण इथे जन्म घेतो. जर आपण कर्माचा योग बनवला तर कुठलेही बंधन आपल्यावर परिणाम करू शकत नाही व आपल्याला जखडूही शकत नाही. माझे संपूर्ण जीवन कर्मयोग असल्यामुळे ज्या पांडुरंगाने रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले त्याच्या बरोबर मी ७० वर्षे जीवन व्यतीत करणार आहे. प्रत्येक क्षणी पांडुरंग माझ्या बरोबर असेल आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.
माझा ज्यांच्याशी विवाह झाला त्यांचे खरे स्वरूप मला ज्ञात नव्हते. त्या रूपात स्वामीच आल्याचे सत्य स्वामींनी उघड केले. गोरा कुंभाराबरोबर पांडुरंग त्याच्या भावाच्या रूपात वावरला. एकनाथांबरोबर १२ वर्षे पाणक्याच्या रूपात वावरला. त्याचप्रमणारे माझ्याबरोबर पांडुरंग माझ्या पतीच्या रूपाने वावरला.
त्या भक्तांना, ते परमेश्वरासोबत राहात असल्याचे ज्ञात नव्हते, त्यांना ते अखेरच्या काळात उमजले. त्याचप्रमाने मीही कोणाबरोबर जीवन जगले हे मला माहीत नव्हते. हे सर्व स्वामींनीच मला सांगितले.
ज्यांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्याविषयी मी अनभिज्ञ होते. माझा कृष्णाशी विवाह झाला होता. मी पांडुरंगाबरोबर जीवन जगले आणि सरतेशेवटी माझा रंगनाथाशी योग होईल. स्वामींनी हे सिद्ध केले की, कृष्ण, पांडुरंग आणि रंगनाथही तेच आहेत.
* * *
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा