गुरुवार, ३१ मार्च, २०२२
रविवार, २७ मार्च, २०२२
गुरुवार, २४ मार्च, २०२२
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म (स्वधर्म ), सदाचरण याच्याशी निष्ठावंत राहिले पाहिजे. "
७
श्वास आणि उच्छवास
त्यांनी अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर ते बरे झाले. जेव्हा आपण या भौतिक जीवनाचा परमेश्वरासाठी त्याग करतो, तेव्हा कर्म कमी होतात. काही वेळा ती पूर्णपणे नाहीशीही होतात. मी याविषयी नंतर लिहीन.
आपल्या जीवनात कर्म अतिशय तरलतेने कार्य करीत असतात. कधीकधी स्वामींच्या विशेष कृपेचा वर्षाव होतो आणि कर्म नाहीशी होतात. पण ही सर्वसामान्य बाब आहे, असे कोणी समजू नये. माझ्या प्रार्थनांनी किती लोक त्यांच्या जीवघेण्या आजारांतून मुक्त झाले याविषयी 'प्रेम निवारण साई' पुस्तकात मी लिहिले आहे. त्यांच्या रोगांचे कारण असलेले कर्मच संपूर्णपणे धुवून टाकले गेले.
एसव्हींना पित्ताशयातील खड्याचा त्रास झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. ते इकडे आले. मी त्यांच्या पोटावर विभूती लावली आणि प्रार्थना केली. जेव्हा ते पुन्हा स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले तेव्हा पित्ताशयातील खडा नाहीसा झाला होता. स्वामींची विशेष कृपा कार्य करते हेच या सर्व घटना दर्शवितात.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
अजय साईराम
बुधवार, २३ मार्च, २०२२
रविवार, २० मार्च, २०२२
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय. "
७
श्वास आणि उच्छवास
केवळ त्यागानेच अमरत्व प्राप्त होत असते. त्यागाविना आपण कर्म कमी करू शकत नाही. कृती, संतती अथवा संपत्ती आपल्याला अमरत्व बहाल करू शकत नाही; तर फक्त त्यागानेच मिळू शकते. म्हणूनच, जेव्हा एखादा सर्वसंगपरित्याग करून परमेश्वरासाठीच जगतो, तेव्हा त्याचा कर्मांचा नाश होतो. इथे एक उदाहरण देते.
माझ्या बालपणी, राजारामस्वामीजी नावाचे संन्यासी आमच्या घरी वरचेवर येत असत. मी त्यांना एकदा विचारले, " तुम्ही संन्यासी कसे झालात ?"ते म्हणाले, "मला मणक्याची ट्युमर झाला होता. तेव्हा काही उपचार होण्यासारखे नव्हते. मला सांगितले गेले की मी मरणार. मी प्रतिज्ञा केली की जर मी बरा होऊन जीवंत राहिलो तर माझ जीवन परमेश्वरास अर्पण करीन. ट्युमर नाहीसा झाला आणि मी संन्यास घेतला."
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
गुरुवार, १७ मार्च, २०२२
रविवार, १३ मार्च, २०२२
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे. "
७
श्वास आणि उच्छवास
हा अवतार प्रेमाची शिकवण द्यायला आला आहे. प्रेम एकता उत्पन्न करते, त्याचा सर्वांना फायदा होतो. प्रेमाच्या अभावाने कुटुंब विभक्त होतात. राजकारण, धर्म, जातपात यांच्याद्वारे जगात सर्वकाही दुभंगलेले आहे. सर्वदूर द्वेष आणि वैर आहे. स्वामी या जागाच परिवर्तन करण्यासाठी अवतरित झाले आहेत. गेली ऐंशी वर्षे ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रेमाविषयी बोलले. तरीसुद्धा कितीजणांचे परिवर्तन झाले ? येत्या २८ वर्षांत जे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणतील, ते पूर्णत्व, परमअवस्था प्राप्त करतील. स्वामींच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यबरोबर असणारे, ज्यांनी स्वामींच सत्य ओळखलय, जे दिवसरात्र परमेश्वराच्याच विचारात जगत आहेत असे जुने भक्त पूर्णम् प्राप्त करतील. ऋषीमुनीदेखील ' पूर्णम् ' असतील, ते सत्ययुगात पूर्णम् च राहतील - आणि १००० वर्षांनी युग बदलेल तेव्हा पुन्हा जन्म घेणार नाहीत.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
गुरुवार, १० मार्च, २०२२
रविवार, ६ मार्च, २०२२
गुरुवार, ३ मार्च, २०२२
मंगळवार, १ मार्च, २०२२
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
महाशिवरात्री संदेश
दिव्यात्मस्वरूपलारा !
नरजन्माचे दुर्लभ भाग्य लाभल्याने मनुष्याने उत्कृष्टता प्रकट करण्यासाठी निरंतर प्रत्यत्न केले पाहिजे.
मेघांमधून बरसणारे पावसाचे अमृतथेंब प्राशन करण्यासाठी चातक पक्षी अत्यंत आतुरतेने प्रतिक्षा करत असतो. भयंकर तूफान विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट डोळ्यापुढे अंधेरी आणणारे विद्युल्लतांचे तेज ह्याने तो त्याच्या एकाग्रतेचा भंग होऊ देत नाही. अशाच तऱ्हेने साधकानेही परमेश्वराविषयी व्याकुळ भावनेने त्याचे हृदय भरून घेतले पाहिजे सुख-दुःख , नफा-नुकसान, मान - अपमान ह्यासारख्या सर्व बाजूंनी त्याच्यावर प्रहार करणाऱ्या गोष्टी तसेच पालक, नातेवाईक वा त्याचे सखेसोबती ह्यांनी त्याचा उपहास केला, त्याला विरोध दर्शवला वा तिरस्कार केला तरी त्याने विचलित वा अस्वस्थ न होता प्रेमामृताच्या परमेश्वरी कृपेची प्रतीक्षा केली पाहिजे.
प्रार्थना ओठातून नव्हे तर हृदयातून आली पाहिजे परंतु आजकाल बहुतांशी साधक केवळ अभिनय करतात आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिखावा करतात. त्यांनी परमेश्वरास केलेल्या प्रार्थना, विनवण्या ह्या हृदयातून न येता केवळ ओठातून येतात. त्यांचा शब्द खरा मानून जर परमेश्वर त्यांच्या समोर उभा ठाकला व त्यांनी मागितलेली मुक्ती त्यांना प्रदान केली. तर त्यांचे शब्द अडखळायला लागतात, अंग थरथरू लागते ते म्हणतात, " हे प्रभू, मी केवळ सवयीनुसार, यांत्रिकपणे मुक्तीसाठी प्रार्थना केली परंतु जर त्यामुळे माझी पत्नी व मुले एकाकी पडणार असतील आणि माझ्या स्वकष्टर्जित संपत्तीचाही त्यामध्ये समावेश असेल तर ही मुक्तीची भेट माझ्या मृत्युनंतर प्रदान करा. ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मनाला इतरांमधील दोष शोधण्यासाठी मुभा देऊ नका नाहीतर मन प्रदुषित होईल. त्याऐवजी मनाला इतरांच्या सद्गुणांवर व निष्पक्षतेवर केंद्रित करा म्हणजे मन निर्मळ आणि पवित्र होईल.
भावनांच्या उन्मादात मनुष्य स्वतःचा मूळ स्वभाव बाजूला सारून इतरांवर दोषारोप करतो वा इतरांवर अपशब्दांचा मारा करतो, त्यांना काही इजा व्हावी अशी इच्छा करतो वा त्यांच्या दुःखात आनंद मानतो. असे हे वाईट विचार त्याच्या मनात रुजतात व मनामध्ये कुविचारांचे तण माजते व त्या बदल्यात दुःखभोग वाट्याला येतात. इतरांची चिंता कशाला ? जर ते तुम्हाला आवडत असतील तर त्यांच्याशी संवाद करा, आवडत नसतील तर त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. त्याच्यामधील दोष का शोधता ? त्यांच्याविषयी वाईट का बोलता ? असे करून तुम्ही तुमच्या आध्यात्मिक अधःपतनास आमंत्रित करता आणि तुम्ही करत असलेल्या, जप, पूजा, ध्यान, दर्शन ह्यामधून प्राप्त झालेले पुण्य गमावून बसता.
मानवी मानाने परिवर्तनाचा अनुभव घ्यायलाच हवा. मनाला बंधांसाठी नव्हे तर मोक्षासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मनाने बहिमुर्ख न होता, भौतिक विश्वात रममाण न होता अंतर्मुख झाले पाहिजे, ईश्वराभिमुख झाले पाहिजे. तुम्हाला खूश करण्यासाठी मन नाना क्लूप्त्या लढवते तुम्ही स्वामींना वंदन करून शरणागती पत्करल्याचे घोषितही कराल परंतु एकदा तुम्ही तेथून दूर गेलात की तुमचे वर्तन विपरीत असेल. साधना करणे तुमचे कर्तव्य आहे, आंतरीक उत्कट इच्छा आहे, तुमचा खराखुरा क्रियाकलाप आहे. बाकी सर्व ईश्वराच्या इच्छेवर सोडा हा तुमचा पवित्र महाशिवरात्रीचा संकल्प असायला हवा.
भगवान श्री सत्यसाई बाबांच्या महाशिवरात्री संदेश
२९-०२-१९८४
जय साईराम