ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"केवळ साधना आणि परिवर्तन याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते. "
७
श्वास आणि उच्छवास
ओझ हलक करण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे परमेश्वरास संपूर्ण शरण जाणे. जर आपण परमेश्वराची सतत प्रार्थना करून संपूर्ण शरणागती पत्करली तर कर्माच्या ओझ्याचा परिणाम होणार नाही. जर आपल्यावर परमेश्वराच्या विशेष कृपेचा वर्षाव झाला, तर कर्म बदलूही शकतात. अर्थातच, हे अतिशय दुर्मिळ आहे.
तारीख १५ डिसेंबर २००८ ध्यान
वसंता - स्वामी, सत्ययुगाच्या शेवटी जुनी कर्म पुन्हा कशी लागू होणार ? तोपर्यंत ती कुठे बर असणार ?
स्वामी - तुझ्या भावविश्वाचं सामर्थ्य त्या कर्मांना अकार्यक्षम करून निश्चल करील. सत्ययुगाच्या शेवटी ती कर्म परत येतील.
वसंता - स्वामी, स्वामी मला तुम्ही हवे आहात. मला दुसर काही नको.
स्वामी - कितीवेळा हे बोलतेस ?
वसंता - हा माझा श्वास आहे.
स्वामी - प्रत्येकवेळा श्वास घेताना तू बोलतेस, 'मला तुम्ही हवे, मला परमेश्वर हवा' आणि प्रत्येक उच्छवासागणिक बोलतेस, ' मला काही नको, मला काहीही नको.' हे भाव स्तूपात जाताहेत आणि जग व्यापून टाकताहेत.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा