ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - 3 जानेवारी
" जेव्हा मनुष्याला भौतिक वस्तुंपासून मिळणारी शांती ही खरी शांती नाही ह्याचा बोध होतो आणि तो खऱ्या शांतीच्या स्रोताचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरु होतो. "
आता आपण पाहू या. भौतिक सुखे मनुष्याला आनंद देतात असा त्याचा समज आहे आणि म्हणून तो नेहमी कुटुंब, नातेवाईक, मित्र नांव लौकिक, पद प्रतिष्ठा आणि धनसंपत्ती ह्या गोष्टींचा विचार करतो. ह्या सर्व गोष्टींचा संचय करण्यात तो त्याच संपूर्ण जीवन खर्ची घालतो. ह्या सर्व गोष्टी अशाश्वत आहेत हे त्याच्या लक्षात येत नाही. जेव्हा तो त्याच्या जीवनाच्या खऱ्या उद्देशावर चिंतन करण्यास सुरुवात करतो. तेव्हाच त्याला सत्य उमगते. काही लोकं वयोवृद्ध झाल्यावर अशा तऱ्हेचा विचार करण्यास सुरुवात करतात. तर काहीजणांच्या ते खिजगणतीतही नसते. पालक त्यांच्या मुलांसाठी किती काबाडकष्ट करतात. तथापि वृद्धावस्थेत मुले त्यांच्या आदर ठेवत नाहीत आणि त्यांना वृद्धश्रमात पाठवतात.
हे मानवा, ह्या सर्व गोष्टींविषयी आसक्ती केवळ तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या चक्रात अडकवते. महामहिम भगवान श्री सत्यसाईनी ८४ वर्षे सर्वांना हीच शिकवण दिली आहे. " विनासक्त होऊन तुम्ही तुमची कर्तव्ये करा. तुम्ही देह नाही आत्मा आहात." असा त्यांनी सर्वांना उपदेश केला.
हा आत्मा सर्वांना व्यापून टाकणारा आहे सर्वव्यापी आहे. परंतु लोकांना त्यांच्या शब्दांमधील सत्याचा बोध होत नाही. देह आणि देहाशी निगडित असणारे सर्वजण हे दोन्ही नाशवंत आहे असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. तुमच्या भोवती " मी आणि माझे " ह्याचे संकुचित (लहान) कुंपण घालू नका. एकमेव परमेश्वर शाश्वत आहे सत्य आहे. अशा पद्धतीने जीवन जगल्यास सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो.. तुम्ही दररोज ह्या सत्यावर चिंतन केलेत तर तुम्हाला परमशांती प्राप्त होईल. आध्यात्मिक जीवनाचा श्री गणेशा होईल. तुम्ही संत, ऋषी आणि आत्मज्ञानी लोकांची जीवन चरित्रे वाचून त्यामधून धडे घ्या. ते कशा तर्हेने जीवन जगले ह्यावर चिंतन करा. तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरु होईल आणि अखेरीस तुम्हाला शांती लाभेल.
बाह्य जगतात, खरी शांती ( Peace ) नाही. वास्तवात केवळ तुकडे तुकडे (Pieces) आहेत. म्हणून आता जा, अंतर्मुख व्हा. बाह्य जगतातील प्रवास, भ्रमंती तुम्हाला केवळ झिरो (शून्यवत) बनवेल याउलट अंतर्यात्रा तुम्हाला हिरो ( अलौकिक महापुरुष ) बनवेल. महामहिम परमेश्वर कलियुगामध्ये भूतलावर अवतरला आणि त्याने मनुष्याला ह्या जगामध्ये उचित जीवन जगण्याचा मार्ग दर्शवला. परंतु किती जणांना हे समजू शकले ? पूर्वीच्या कोणत्याही कलियुगात परमेश्वर भूतलावर अवतरला होता का? त्यांची किमान एक तरी शिकवण अंगिकारून तिचा अभ्यास करा, सर्व करा. आणि जन्ममृत्युच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घ्या. त्यांचा महिमा मी कसा लिहू ? ते सर्वांचे भूत, वर्तमान आणि भविष्य जाणतात. अनेक गोष्टी साक्षात करून त्यांनी सर्वांना दिल्या आहेत त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारांद्वारे त्यांनी परमेश्वराचे सर्वज्ञात, सर्वव्यापकत्व आणि सर्वशक्तिमानता हे गुणविशेष दर्शवले. हा महान परमेश्वर, सामान्य लोकांमध्ये इतक्या सहजतेने कसा काय वावरत होता ? जरी ते त्यांच्याबरोबर वावरत होते तरी त्यांनी स्वामींची महानता ओळखली नाही. ते आले आणि त्यांनी स्वातंत्र्याचे, मुक्तीचे दरवाजे उघडले परंतु कोणालाही स्वातंत्र्य नको आहे. त्याऐवजी त्यांना ' मी आणि माझे ' च्या बंदिवासात राहणे अधिक पसंत आहे. सर्वजण सहजतेने माया जगत् स्वीकारतात आणि त्यामुळे सत्याचा बोध होऊ शकत नाही. सत्य काय आहे ते जाणू शकत नाही आणि जन्मामागून जन्म घेण्याचा प्रवास अविरतपणे सुरु राहतो. किती जन्मांचा प्रवास ?
आध्यात्मिक प्रवास सुरु झाल्यानंतरच मनुष्याला शांती प्राप्त होते. एखादा लखपती असेल. उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असेल वा मोठा शास्त्रज्ञ असेल असे असूनही त्याला शांती नाही. कोणतेही प्रतिष्ठित पद शांती देऊ शकत नाही. केवळ अध्यात्माद्वारे मनुष्याला शांती प्राप्त होते. पांडुरंगाचे सर्व भक्त गरीब कुटुंबातील होते आणि न्हावी, व्यापारी, गृहिणी, कुंभार, खाटीक, चांभार इ. हलक्या दर्जाचे व्यवसाय करणारे होते. सर्वजण शांतीपूर्व जीवन जगले. सर्वांनी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाद्वारे परमेश्वराला जाणले. जेव्हा जेव्हा त्यांना अडचणींचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या मदतीस आला. ते सर्व पांडुरंगाचे प्रसिद्ध भक्त आहेत. येथे आपण पाहतो की ना पद ना नावलौकिक केवळ भक्ती मनुष्याला शांती प्रदान करते. आध्यात्मिक जीवनात जातपात, पंथ, पद, प्रतिष्ठा असे कोणतेही अडथळे येत नाहीत केवळ भक्ती पुरेशी आहे. भक्ती शांती प्रदान करते. हे त्यांच्या जीवनाच्या उदाहरणाद्वारे आपण शिकतो.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा