रविवार, २० मार्च, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय. "

श्वास आणि उच्छवास

          केवळ त्यागानेच अमरत्व प्राप्त होत असते.  त्यागाविना आपण कर्म कमी करू शकत नाही. कृती, संतती अथवा संपत्ती आपल्याला अमरत्व बहाल करू शकत नाही;  तर फक्त त्यागानेच मिळू शकते. म्हणूनच, जेव्हा एखादा सर्वसंगपरित्याग करून परमेश्वरासाठीच जगतो, तेव्हा त्याचा कर्मांचा नाश होतो. इथे एक उदाहरण देते. 

            माझ्या बालपणी, राजारामस्वामीजी नावाचे संन्यासी आमच्या घरी वरचेवर येत असत. मी त्यांना एकदा विचारले, " तुम्ही संन्यासी कसे झालात ?"ते म्हणाले, "मला मणक्याची ट्युमर झाला होता. तेव्हा काही उपचार होण्यासारखे नव्हते. मला सांगितले गेले की मी मरणार. मी प्रतिज्ञा केली की जर मी बरा होऊन जीवंत राहिलो तर माझ जीवन परमेश्वरास अर्पण करीन. ट्युमर नाहीसा झाला आणि मी संन्यास घेतला."

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा