रविवार, २७ मार्च, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  
सुविचार 
       " आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे. "
                           श्वास आणि उच्छवास

           मुक्ती निलयममधील दहा जण सर्वत्याग करून माझ्याजवळ येऊन राहिलेत. त्याचप्रमाणे जर हजार लोक एकटे किंवा कुटुंबासमवेत इथे येऊन राहिले तर त्यांना नक्कीच मुक्ती मिळेल. सर्वांना माझी पुस्तके वाचण्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा जरूर लाभ होईल. 
            जेव्हा मी ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' पुस्तक लिहिले, तेव्हा मी म्हणाले, " ज्यांना परमेश्वरासोबत रहायचे आहे त्यांनी या. आश्रमाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. जर तुम्ही इथे येऊन राहिलात तर तुम्ही सर्व कर्म नाहीशी होतील. " मी इथे असणाऱ्यांना सांगते की ' इथे सतत रहा ', पण कोण बरे इतके परिपक्क आहे? 
           जर लोक माझ्या अखेरच्या काळात आले तर मी काही करू शकणार नाही. स्वामी जगाला परिवर्तनासाठी २८ वर्षे देत आहेत. मी फक्त ९ वर्षे देत आहे. जर तुम्ही इथे आलात तर मी नक्कीच तुमचा कर्मसंहार करिन. परंतु, 'अम्मा आपल्याला मुक्ती देतील' असे गृहीत धरून चालू नका. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा