ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधनेच्या मार्गाद्वारे साधक अध्यात्मातील उंच उंच शिखरे पादाक्रांत करतो. "
७
श्वास आणि उच्छवास
एका व्यक्तीने दुसऱ्याच्या कर्मात हस्तक्षेप करू नये. मी याविषयी ' इथेच, याक्षणी, मुक्ती भाग -२' पुस्तकाच्या ' कर्माची तरलता ' या प्रकरणात लिहिले आहे. जर एखाद्याने दुसऱ्याची कर्म हलकी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. म्हणून दुसऱ्याच्या कर्मात ढवळाढवळ करू नका.
कुटुंबातील एखादी व्यक्ती त्याच्या पूर्वकर्मांमुळे पीडित असेल तर कुटुंबाचे सदस्य ' मी तुझे ओझे वाहतो ' असे म्हणू शकत नाहीत.
प्रवासात एका कुटुंबाच्या सामानाच्या अनेक बॅगा असतात. त्यावेळी सर्वजण ' मी ह्या बॅगा घेतो, तुम्ही दुसऱ्या घ्या ' असे म्हणून मिळून सामान उचलतात. अशावेळी ओझी वाटून घेणे आणि एकमेकांना मदत करणे हे स्वाभाविक आहे. पण कर्माच्या बाबतीत असे नाही ; तुमच कर्माच ओझ तुमच्यासाठी कोणीही वाहू शकत नाही.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा