गुरुवार, १७ मार्च, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" परमेश्वर केवळ शुद्ध, निष्कपट हृदयामध्ये वास करतो."
श्वास आणि उच्छवास

            जर प्रत्येक कुटुंबाने केवळ परमेश्वरासाठी कुटुंबातील एका व्यक्तीचा त्याग केला तर त्यांना त्यांच्या कर्माची झळ फारशी लागणार नाही. उदाहरणार्थ, निर्मला माझ्याबरोबर बरीच वर्षे आहे. ती सतत सर्वस्वाचा त्याग करून मुक्ती निलयममध्ये राहते आहे. गेल्या वर्षी तिच्या बहिणीला तुरुंगात टाकले गेले आणि तिचे नवजात बालक बाहेर होते. निर्मला रडली. मी स्वामींकडे प्रार्थना केली आणि आठवड्याभरातच तिच्या बहिणीची तुरुंगातून सुटका झाली. काही दिवसांनी तिला समजले की तिच्या भावाला मेंदूचा रोग होऊन रुग्णालयात ठेवले आहे. मी स्वामींजवळ प्रार्थना केली. त्यानंतर लवकरच तो बरा झाला. तिने फक्त एकदाच सांगितले. मी सुद्धा त्या दोघांसाठी फक्त एकदाच प्रार्थना केली. हे सर्व कास काय घडल ? हे घडल निर्मलाच्या त्याग आणि श्रद्धेमुळे. एका व्यक्तीच्या संपूर्ण त्यागामुळे त्याच्या कुटुंबियांचे कर्माच्या दुष्परिणामांपासून रक्षण होते. त्यागाविना, परमेश्वरासाठी न जगता कोणी विचारेल, ' आमची कर्म कमी होणार नाहीत का ? किंवा बदलणार नाहीत का ?' उत्तर असेल 'नाही ' मी मागील प्रकरणात लिहिले आहे की सर्वांनी त्यांची कर्म अनुभवायलाच हवीत. या दोन कुटुंबांच्या उदाहरणावरून, तुम्हाला कर्मकायद्याचे कार्य कसे चालते हे कळलेच असेल. उपनिषदातील श्लोक हेच स्पष्ट करतो,
...' न कर्मणा न प्रजाया धनेन त्यागेनैके अमृतत्व - मानशुः'      

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा