ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण केवळ ह्या परमेश्वराच्या निर्मितीचे विश्वस्त आहोत आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही. "
७
श्वास आणि उच्छवास
माझे भाव स्तूपाद्वारे अवकाशात पसरताहेत आणि जगातील नकारात्मक कंपने नाहीशी करताहेत. हे सर्व मी ' इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी) प्रकरणात लिहिले आहे. माझे भाव स्तूपात आहेत. हा स्तूप निर्जंतुक पेटीसमान बाह्यजगापासून सत्ययुगाची संरक्षण करतो. स्वामी म्हणतात की ह्या स्तूपाने सत्ययुगाला कवच घालून झाकून ठेवले आहे. काहीही नकारात्मक आत शिरू देत नाही.
उदाहरणार्थ, शस्त्रक्रिया करताना रुग्णाला भूल दिली जाते. जर अतिशय वेदना होत असतील तर अफूच्या अर्काच इंजेक्शन दिल जात, त्यामुळे त्याला वेदनांची जाणीव होत नाही. अफू अत्यंत तीव्र औषधी द्रव्य आहे. त्याचा असर काही काळ राहतो; त्यानंतर वेदना पुन्हा जाणवायला लागतात.
ह्याचप्रकारे, माझे भाव दुष्ट विचारांना अंतराळात शिरू देणार नाहीत. हे १००० वर्षे चालू राहील. हेच सत्ययुग असेल. सत्ययुगाच्या शेवटी, अकार्यक्षम आणि निश्चल राहिलेली कर्म हळूहळू कार्यक्षम होऊ लागतील. कर्मांचा काटा आणि दुष्ट विचार पुन्हा कार्यरत होतील.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा