गुरुवार, ३० मार्च, २०२३
रविवार, २६ मार्च, २०२३
गुरुवार, २३ मार्च, २०२३
रविवार, १९ मार्च, २०२३
गुरुवार, १६ मार्च, २०२३
रविवार, १२ मार्च, २०२३
गुरुवार, ९ मार्च, २०२३
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - ३
नाम रूप आणि नातेसंबंध ह्या विना प्रेम
वसंता: स्वामी, प्रेम कसं उद्भवतं?
स्वामी: नाम रूप आणि नातेसंबंध ह्यामधून प्रेम उद्भवतं. नाम आणि रूप आपल्याला आकर्षित करते आणि प्रेमाला सुरुवात होते. प्रेमाची पाळेमुळे नातेसंबंधांमध्ये घट्ट रुजलेली असतात तथापि हे सर्व नातेसंबंध तात्पुरते आणि मिथ्या असतात. आपले खरे नातेसंबंध कोणाशी आहेत हे जाणणे म्हणजेच ज्ञान होय. हा शाश्वत आनंद आहे.
नातेसंबंध हा नामरुपाचा पाया आहे. आपले जीवन ह्याच तत्त्वावर आधारित आहे. जन्म घेण्यास हेच कारणीभूत होते. जर आपण भिंतीवर चेंडू फेकला तर तो आपल्याकडे परत येतो. जर भिंत अस्तित्वात नसेल तर तो चेंडू दूर जातो आणि आपल्याकडे परत येत नाही.
भिंत म्हणजे मायेचे,भ्रमाचे रूपक आहे. आपली कर्म त्या मायेच्या भिंतीवर आपटतात आणि प्रतिक्रिया निर्माण करतात. माया म्हणजे काय हे ओळखून, तिला दूर सारली पाहिजे. परमेश्वर एकमेव अद्वितीय सत्य आहे, बाकी सर्व माया आहे, हे ज्ञान तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाते. सत्या मधून आलेले
आपण पुन्हा सत्यामध्येच विलीन होणार. ह्या पुस्तकामध्ये, बंधांमधून भाव कसे निर्माण होतात हे आपण पाहूया.
तत्त्व : रूप+नाम+नातेसंबंध= बंध
स्वामिनी म्हटले आहे,
प्रेम केवळ नाम रूप आणि नातेसंबंधांमधून उद्भवते. तू अखिल विश्वासाठी मुक्ती मागते आहेस. हे नाम,रूप आणि नातेसंबंधांविना असलेले प्रेम आहे. समस्त विश्वाप्रती असलेली करुणा आणि प्रेम ह्यामधून हे उद्भवले आहे. वैश्विक मुक्ती ही ह्याची परिणती आहे.
हे विश्व असंख्य नामरूपाने भरलेले आहे. ज्याविषयी मी जाणत नाही आणि माझे त्यांच्याशी नातेसंबंधही नाहीत. मानव जातीचे दुःख आणि पीडा पाहून, वैश्विक मुक्ती ही माझी कळकळीची प्रार्थना बनली आहे. ही कोणत्याही कारणाशिवाय, नामरूप आणि नातेसंबंधांशिवाय केलेली प्रेमाची प्रार्थना आहे.
-- श्री वसंत साई अम्मा 🕉
🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸
🌸ओम श्री साई वसंतामृत दायकाय नमः🌸
जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जन्म मृत्युच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी परमेश्वर प्राप्ती हा एकमेव मार्ग आहे. "
१६
गेले ! ते दिन गेले
आता ना पुराणांचे भय ना पापाची भीती ! पूर्वी वाईट वागणाऱ्याला परमेश्वर शिक्षा करेल असे सांगितले जात असे. शब्दांमधून नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात असे आणि काटेकोरपणे शिस्त पाळली जाई. घरी किंवा शाळेत मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करून आदर्श दर्शवला जात असे. शिक्षकांच्या महान चारित्र्याचा आदर्श समोर असल्यामुळे मुले चुकीचे वर्तन करण्यास धजावत नसत. आता घरात कोणी मोठी माणसेच नसतात. लग्न झाले की पती - पत्नि वेगळे घर घेऊन संसार थाटतात. दोघेही नौकरी करतात. मग त्यांच्या मुलांना कोण सांभाळते? त्यांना चांगले - वाईट यातील फरक कोण शिकवते ? आता तर मोठी माणसेसुद्धा पुराणात घालून दिलेली निर्बंध पाळत नाहीत. मग मुलांना कास काय बरं योग्यरितीने वाढवणार ?
संदर्भ -सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम