ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या आचरणाची जाणीव असायला हवी. आपण आपल्याला शुद्ध, निर्मल बनवायला हवे."
१६
गेले ! ते दिन गेले
काळ बदलला असेल पण कर्मकायदा कधीच बदलणार नाही. जर तुम्ही चांगले कराल, तर तुम्हाला चांगलेच पार्ट मिळणार. जर तुम्ही वाईट कराल, तर तुम्हाला वाईटच मिळणार. लोक नीतीतत्वे विसरतात आणि मन मानेल तसे वागतात. पापाची भीती उरली नाही. स्वामींनी सर्वांचे परिवर्तन करून त्यांना प्रेमाची शिकवण देण्यासाठी अवतार घेतलाय. आजचा मानव हा वाईट सवयींचा गुलाम आहे. तो सतत पैसा, प्रसिद्धी, नाव, अधिकार आणि सत्ता त्यांच्या शोधात आहे. सतत भौतिक वस्तूंचा पाठपुरावा करतो आहे. अधिकाधिक भौतिक सुखाच्या आहारी जाऊन त्रास भोगतो.
पुनर्जन्माला कारणीभूत होणाऱ्या कर्मांकडे स्वामी आपल लक्ष वेधत आहेत.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा