ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" योग्य म्हणजे परमेश्वराशी ऐक्य, दिवसाचे २४ तास ईशचिंतन."
१६
गेले ! ते दिन गेले
आमच्या खेड्यातल्या शाळेत फक्त पाच वर्ग होते. आम्ही शाळेत जात असताना वृद्ध मंडळी बाहेर व्हरांड्यात बसलेली असत. ते म्हणत, " मुलांनो, आवाज करू नका, सावकाश जा. " एका घराच्या व्हरांड्यात एक वयस्कर माणूस रामायण वाचत बसलेला असे. दोन- तीन माणसे त्याच्याबरोबर वाचनाच्या संदर्भात चर्चा करीत असत. आम्ही थोडा वेळ तिथे घुटमळत आणि त्यांच्या गोष्टी ऐकत असू. आणि मगच शाळेत जात असू. विष्णू मंदिराजवळ वृद्ध बसलेले असत. ते आम्हाला हाका मारत, " मुलांनो या. " आणि आम्हाला प्रसाद देत. प्रसाद खाऊन सावकाशपणे आम्ही पुढे जय असू. मग एखादा वयोवृद्ध म्हणे, " शाळेची घंटा वाजली, धावा! धावा !"
योग्य मार्ग दाखवण्यासाठी शिकवायला किती बरे वयस्कर माणसे होती ! आता हे सर्व कुठे गेले ? काळानुसार सर्व काही बदलल.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा