ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व जाणवते तेव्हा पुन्हा एक होण्यासाठी विश्व आणि परमेश्वर यांचा योग होतो. "
१६
गेले ! ते दिन गेले
वासना आणि कर्म हे वेगळे करता येत नाही. आणि ह्याचमुळे भाव आणि शरीरही त्रास सहन करत असतात. शरीर भावनांद्वारे आणि भावना शरीराद्वारे भोग भोगत असतात.
इच्छांमुळे माणूस कर्म करतो. कर्मांमुळे इच्छा उत्पन्न होतात. माणूस या कर्मांच्या फळाचा अनुभव घेतो आणि पुन्हा जन्म घेतो. कर्मकायद्याचे हे चक्र आहे. कर्म आणि वासना एकमेकांत गुंफून कर्माचा कायदा बनतो. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत.
जगाच्या वासनेमुळे आमच्या भावनांना क्लेश होतात. म्हणूनच मी स्वामींचा ध्यास घेत असतो. जसे त्यांच्या दर्शनासाठी अडथळे वाढले, तसा माझा ध्यास अनेक पटींनी वाढला. या भावनांचा जोर मला इतका हलवून टाकतो की मला वाटते मी त्यांच्या दर्शनाशिवाय जगूच शकत नाही. या भावनेची शक्ती, जगातील वासना जाळून टाकते. जेव्हा वासना किंवा इच्छा कमी होतात, तेव्हा आपोआपच कर्म कमी होतात. जेव्हा कर्म कमी होतात, तेव्हा स्पर्शज्ञान, जे पुनर्जन्माचे कारण आहे, ते सुद्धा कमी होते. वासना, कर्म आणि स्पर्शज्ञान हे वेगळे होऊ शकत नाही.
आमचा वियोग म्हणजे केवळ माझे भाव जागृत करणे होय. केवळ त्यांची शक्तीच संपूर्ण जगाच्या वासना, विवाह आणि संतती शुद्ध करते आहे. हीच नवी निर्मिती आहे.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा