रविवार, ५ मार्च, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " आपले जीवन एक स्वप्न आहे. जेव्हा आपण त्या स्वप्नातून जागे होऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही सर्व प्रभूची दिव्य लीला आहे. "
१६
गेले ! ते दिन गेले 

ते पूर्वीचे दिवस ... 
          मुलांनी चांगल वागायला शिकाव म्हणून पूर्वीच्या काली मोठी माणसे पुराणातील दाखले देत असत. खोट बोलू नये अशी शिकवण दिली जाई. कधी लहान मुलांना असेही सांगितले जात असे, ' तुम्ही जर खोत बोललात, तर परमेश्वर तुमचे डोळे घेईल!' माझी आजी नेहमी म्हणत असे, " पायऱ्यांवर बसू नये, रस्त्यात पुरुषांशी बोलत उभे राहू नये. तुम्ही बायकांशी बोलू शकता पण त्यांना स्पर्श करू नये ." ती सांगत असे, " संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर बसू नये. " संध्याकाळीच का बरे ? दिवस रात्रीला मिळतो, अशा संध्याकाळच्या वेळी नृसिंह अवताराने, घराच्या आत नाही, बाहेरही नाही म्हणजेच उंबरठ्यावर हिरण्यकश्यपुला मारले होते. पुराणातील गोष्टींच्या आधारे नीतीतत्व आणि आचरणांचे नियम शिकवले जात. उदाहरणार्थ, असे म्हणत असत की, शुक्रवारी कोणाला कर्ज देऊ नये, कारण 'देवी' महालक्ष्मी सोडून जाते ', असा त्यांचा विश्वास होता. 
          अशा सहजसोप्या पद्धतींमधून कितीतरी पुराणांचे नियम शिकवले जात. 

संदर्भ -सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा