ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले जीवन एक स्वप्न आहे. जेव्हा आपण त्या स्वप्नातून जागे होऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही सर्व प्रभूची दिव्य लीला आहे. "
१६
गेले ! ते दिन गेले
तारीख ११ जानेवारी २००९ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, कृपाकरुन मला कर्मकायद्याविषयी अजून थोडं सांगा.
स्वामी - लोकांना वाटते की भौतिक जीवनात आनंद आहे आणि म्हणून ते आनंदाच्या शोधात इकडेतिकडे धावत राहतात. त्यांना थोडासा आनंद मिळतो, आणि मग तो पुनः पुनः अनुभवण्याची इच्छा होते. या इच्छांची कर्म होतात. कर्मकायद्याचे पालन न करता व परिणामांचीही पर्वा न करता माणसं हवे तसे आयुष्य जगतात. त्यांना कर्मकायद्याची जराही भिती वाटत नाही.
वसंता - माझ्या लहानपणी, आम्हाला काय करावे आणि काय नाही हे शिकवले गेले. आता तसे होत नाही.
स्वामी - आता पापाची आणि कर्मकायद्याची भितीच उरली नाही. कर्मकायदा कसा लागू होतो ते दाखवण्यासाठी आपण आलो आहोत.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा