रविवार, २६ मार्च, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " तेलाच्या संततधारेप्रमाणे आपण अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे ." 
१३
गेले ! ते दिन गेले 

          लोकांच्या गैरवतनांमुळे पंचमहाभूते प्रदूषित झाली आहेत. या कर्माच्या ओझ्यामुळे माझ्या पंचेंद्रियांना त्रास होतो. मला वाटले, मला होणाऱ्या यातनांनी कर्मकाटा समतोल होतो... मग अजून त्यांची ओझी कमी कशी होत नाहीत ? मी सतत यावर चिंतन केले आणि मग स्वामींनी सत्य प्रकट केले... 
          स्वामींच्या आणि माझ्या भौतिक यातनांनी जगाची कर्म अर्ध्यानी कमी होतात. उरलेली कर्म प्रत्येकाच्या प्रयत्नांनी धुतली जायला हवी. पुढील अठ्ठावीस वर्षांमध्ये हे परिवर्तन घडायला हवे. 
          जरी स्वामी सतत माझ्याबरोबर असतात, माझ्याशी बोलतात , तरीही मी त्यांच्या दर्शन, स्पर्श आणि संभाषणासाठी रडत असते. मला इतका ध्यास का बरे लागलेला असतो? परमेश्वराच्या भौतिक देहाच्या सान्निध्याची इच्छा करावी ही वासना झाली का ? वासना परमेश्वराला स्पर्शही करू शकत नाही. का ?..... मग मला ही इच्छा का बरे ? हे केवळ सर्वांच्या वासना नाहीशा करण्यासाठी . 

संदर्भ - सत्युयुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा