रविवार, १९ मार्च, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " इतरांमधील दोष शोधू नका. स्वतःमध्ये असणारे दोष शोधू काढा. "
१६
गेले ! ते दिन गेले 

         ' खरच ! स्वामी तुमच्या देहाला किती बरं यातना होताहेत,
          तुम्हाला चालण्यास किती त्रास होतो आहे !'
          आपल्याला स्वामींची काळजी वाटते आणि आपल्या डोळ्यात पाणी येत, पण आपल्याला ह्याची जाणीव आहे का की त्यांच्या ह्या स्थितीला आपणच जबाबदार आहोत ! जर तुम्ही स्वतःला बदलून सदाचारी व्हाल तर स्वामी ठीक होतील. जगाची कर्म हेच त्याच कारण आहे. ती कमी व्हायला हवीत. तुमच्या स्वतःच्या वाईट विचारांच्या बाबतीत सावध रहा. स्वामींच्या स्वास्थ्याच्या चिंतेची चर्चा करू नका;  बाह्यस्वरूपी आहे. तुम्ही स्वतःचे अंतःस्थ गुण बदलवून परिवर्तन करा, मग स्वामी ठीक होतील. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा