रविवार, ३१ मार्च, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "


        सहस्रार
          

          अवतार जे कार्य करू शकत नाही, ते कार्य ज्या व्यक्तीचे परमेश्वरावर नितांत प्रेम आहे, अशा व्यक्तीच्या सहस्राराचा प्रकाश पूर्ण करते. अवतार साक्षी अवस्थेत असतात, त्यामुळे त्यांचे कार्य काही मर्यादेपर्यंत सीमित राहते. ते स्वतःभोवती योगमायेचा पडदा घालतात आणि फक्त मर्यादित उघड करतात. उदाहरणार्थ, स्वर्गातून पडणाऱ्या गंगा नदीच्या प्रवाहाचा जोर धरती सहन करू शकली नसती, म्हणून शंकराने तिला आपल्या पुस्तकात धारण केले व जटांमधून तिचा प्रवाह जाऊ दिला. त्याचप्रमाणे परमेश्वराची संपूर्ण शक्ती धरती सहन करू शकणार नाही, म्हणून अवतार स्वतः योग मायने झाकून फक्त थोडेसे वैभव प्रकट करतात. श्री सत्यसाई अवतार त्याचे परिपूर्ण रूप प्रकट करत नाहीत. ते वेळोवेळी थोडेसे वैभव दाखवतात, परंतु त्यांच्या निर्मितीची गुपिते उघड करीत नाहीत.
             माझी भक्ती परमेश्वराकडून अनेक सत्य आणि गुपिते खेचून घेऊन उघड करते. जेव्हा मनुष्य परमेश्वर अवस्था प्राप्त करतो, तेव्हा त्याला अत्युच्च गुपिते सांगितली जातात. ती जगाच्या कल्याणासाठी उपयोगात आणली जातात. एखादी व्यक्ती परमेश्वर कशी बरे होऊ शकते? माणसाची कुंडलिनी नवीन योग कसे निर्माण करू शकते? हेच मी जगाला दाखवून देत आहे. माझे स्वामी वरील एकाग्र प्रेम, त्यांच्या प्राप्तीचा ध्यास, यातूनच निर्मितीची गुपिते प्रकट होत आहेत.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा