गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

१३ 
नभ गुरु 

या बाहुलीत परमेश्वरच हसतो आहे.
तोच या बाहुलीत रडतो
आणि तोच या बाहुलीला मारपीटही करतो
हं! म्हणजे मारणारा आणि मार खाणारा
दोन्ही परमेश्वरच
मी शून्य आहे.

हे नभा, आता मज उमजली कला तुझी
अंधार, प्रकाश, चंद्र, सूर्य, मेघ
काहीही घडू देत
नभ हे नभच राहते, अविचल
तशीच, ही बाहुली बाहुलीच राहील.
जे होईल तो (परमेश्वर) सोसेल
सर्व काही त्यालाच मिळते
प्रसिद्धीही त्याचीच,
दोषही त्यालाच.
मी हाकलले गेले
म्हणजे त्यांनी त्यालाच हाकलले
मला बसविले सिंहासनी
तर तोचि बैसे सिंहासनी.
आता मला उमगले

नभ राही स्थितप्रज्ञ,
दुरून देखता पर्वतशिखरे
स्पर्श करिती क्षितीजाला
अन् समीप जाता उमजे,
तो भासचि असे.
स्पर्श नाभासी अशक्य असे
ते व्यापुनी टाकी विश्व जसे
हीच स्थिती बाहुलीची असे.
प्रेम होतसे व्यापक
व्यापे सारे विश्व
बाहुली ही मूर्तिमंत प्रेम
तिज नसे 'मी',
ही असे परमेश्वराहाती बाहुलं
म्हणूनच ते नाभासम व्यापितसे सारे विश्व.
   
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " यद भावं तद भवति. "

१३ 
नभ गुरु 

           माझ्याकडे काही शक्ती आहे का नाही हे मला ठाऊक नाही. जर मला माहित असते, तर मी ती प्रकट केली असती. मला अहंकार नाही. मानवी शरीरात वावरणारी मी एक बाहुली आहे. चावी लावली की ही बाहुली कार्य करते. हिची चावी परमेश्वराजवळ आहे. त्याने हसवले तर ती हसते. त्याने रडवले तर ती रडते. तिला वेगळ्या भावना नाहीत. या बाहुलीच्या शरीरात प्रत्यक्ष परमेश्वर चैतन्य आणि भावस्वरूपात नांदत आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

१३ 
नभ गुरु 

            श्रीकृष्णाने शिशुपालाचे शंभर अपमान सहन केले. दुर्योधनाच्या योजनेतून प्रभू निसटले. कंसाने सोडलेल्या अनेक बाणांपासूनही वाचले. जन्मापासूनच त्यांनी परमेश्वरी अवस्था दर्शवली. ते परमेश्वर असल्यामुळे त्यांनी सर्व राक्षसांना मारले. ते परमेश्वरी अवस्थेत, ज्ञानी अवस्थेत आहेत; त्यांनी त्यांच्या विविध दिव्यशक्ती प्रकट केल्या.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम