ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते."
१३
नभ गुरु
नभ गुरु
कुंतीला सूर्यदेवांना पाहण्याची इच्छा झाली, परंतु जेव्हा ते तिच्याजवळ आली, तेव्हा ती त्यांचे तेज सहन करू शकली नाही. उषेने सूर्यदेवांशी विवाह केला. दोन पुत्रांना जन्म दिल्यानंतर तिला त्यांचे तेज असह्य झाले म्हणून तिने छाया उषा निर्माण करून स्वतः अरण्यात तपश्चर्येस गेली. मलाही परमेश्वराशी लग्न करायचे होते, परंतु ते इतके कठीण असेल याची कल्पना नव्हती. हे जर मला अगोदरच माहीत असते तर मी ती इच्छा जागृत होताच उपटून फेकून दिली असती.
मज जर ठाऊक असता, कुंतीसम,
माझ्या मुलांच्या जन्मानंतर,
परमेश्वरास मी विसरले असते;
उषेसम, जीवन मी तपश्चर्येत घालविले असते.
साई सूर्याची आंच भिडली येऊन मज
ही किरणे असे का ग्रहण?
हा हल्ला तर नवे नवग्रहांचा?
किल्ला असे नवग्रहांचा परमेश्वरासभोवती
साहवेना मज त्यांचा भडिमार
परमेश्वरी तेजाचा परिणाम नाही का तयांवर ?
कसा विलक्षण हा भगवंत !
न तो जाळी तयांना
न ते जाळी मजला
परमेश्वर हीच शीतलता.
अरे ...कलीचा स्वभाव असे का
कारण या सर्वाला?
होय, अगदी बरोबर
म्हणूनची, अवतार न येती कलियुगी.
न दिसे प्रेम इथे, नसे थारा शुद्ध प्रेमासी.
सत्य होई दुर्लक्षित.
धर्म अस्थिर, उभा केवळ एक पायावरी
अवतरला का भगवंत हा कलियुगी?
ठीक आहे, तो अवतरला.....
नाश करूनी कलिचा.... करा धर्म स्थापना अन् जा.
कशासाठी हा प्रयोग नवा ?
केला संकल्प प्रेमस्थापनेचा
संकल्पपूर्तीसाठी गरज भासे निरागस स्त्रीची
बळीचं कोकरू
हीच असे का ईश्वरेच्छा ?
दे मजसी यज्ञात आहुती, जैसा अरवन.
प्रार्थिते मी तुझ्या चरणी
विषप्राशुनी कणाकणांनी मृत्यू न यावा,
क्षणार्धात या जीवनाचा अंतची व्हावा.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा