ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
हे पुस्तक वाचून जे स्वतःची चूक समजतील, त्यांना परमेश्वराने माफ करावे अशी मी प्रार्थना करते, गरीब बिचाऱ्या या काही लोकांनी काय केले ? ते कैकयी आणि मंथराप्रमाणेच फक्त साधन आहेत. मला त्यांच्याविषयी जराही राग अथवा तिरस्कार नाही. मी जेव्हा स्वामींजवळ येईन तेव्हा सर्वांना आनंद होईल. कोणाच्याही दुःखाचं मी कारण होणार नाही. इतरांनी जरी मला त्रास दिला तरी मी त्यांना त्रास देणार नाही. सर्व जग माझीच मुले आहेत. मी इथे फक्त जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे. जगात कोणालाही त्रास होऊ नये, आमच्या दूर होण्यानेच अवतारकार्य होऊ शकणार आहे. मी त्यांच्याकडे जे अश्रु ढाळते आहे, त्यामुळेच जगाची कर्म नाहीशी होत आहेत.
स्वामी म्हणाले की ज्यांनी पापं केली, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मी म्हणते, ' ते पापी नाहीत, ते अवतारकार्याचे फक्त साधन आहेत.' जर असे नसते तर ते परमेश्वराच्या इतके जवळ कसे असते? मी त्यांच्यासाठी रडते आणि स्वामींशी नेहमी वाद घालते. मंथरेने चूक केली होती. त्यांनतर कृष्णावतारात तिच्यावर श्रीकृष्णाची कृपा झाली. आता जे स्वामींजवळ आहेत आणि चूक करीत आहेत, (जर त्यांना त्यांची चूक उमगेल ) तर त्यांना स्वामींच्या कृपेचा लाभ होईल.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा