बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
            हे सर्व ऐकल्यानंतर माझे अश्रू अनावर झाले. ज्याची मी दीर्घ काळापासून प्रतिक्षा करत होते ते मांगल्ये मला मिळणार का? त्या दिवशी मी कुटुंबाचा आणि सांसारिक जीवनाचा त्याग करून एक संन्यासिनीच्या रूपात ध्यान सभागृहात प्रवेश केला. भगवानांनी केलेली व्यवस्था अचूक होती, परिपूर्ण होती. परमानंदाची अनुभूती घेण्याचेही नाकारल्यामुळे मला हे पद प्राप्त झाले असे मला वाटते. भगवानांच्या असीम कृपेच्या विचाराने मला माझ्या अश्रूंवर ताबा राहिला नव्हता. कोदाईंचा मला फोन आला. मी अश्रू ढाळतच त्यांना जे घडले ते सर्व सांगितले. त्यानंतर एस व्हींनाही सांगितले. ते आश्चर्यचकित झाले व म्हणाले," नाडीग्रंथात तुमच्याबद्दल लिहिलेले बरोबर आहे. तुम्ही वयाच्या ६३ व्या वर्षी सर्व बंध तोडून संन्यस्त जीवन जगाल असे त्यामध्ये लिहिले आहे. त्यानुसार भगवान हे सर्व करत आहेत.
            दुसऱ्या दिवशी पुन्हा काही विचार उद्भवले. स्वामींचे मांगल्य घालण्यास मी पात्र आहे का? स्वामींच्या सामर्थ्याच्या तुलनेत मी काय आहे? हा पवित्र धागा घालण्यास मी पात्र नाही. प्रथम मी त्यासाठी स्वतःला पात्र बनवले पाहिजे आणि त्यानंतरच त्याची इच्छा केली पाहिजे, तोपर्यंत हे मला नको आहे. आपण जीवनात जे प्राप्त करतो त्यासाठी आपण सत्पात्र असायला हवे म्हणून मी मला पात्र बनवण्यासाठी भगवानांकडे अखंड प्रार्थना करत होते आणि तोपर्यंत ते मला नको असल्याची सांगत होते.
स्वामी: तुझ्यामध्ये सर्व गुण आहेत तू त्यासाठी पात्र आहेस. योग्य वेळ येताच हे सर्व ज्ञात होईल. तू आणि मी एकच आहोत. तू माझ्यापासून वेगळी झाली आहेस. मी यासाठी पात्र नाही, असे तू म्हणशील का?
            स्वामींचे बोल ऐकून मी चकित झाले. स्वामींच्या सर्वज्ञतेविषयी मला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटत होते. प्रत्येक गोष्ट सुसंगतपणे व अचूक घडली.
मी संन्यास घेण्याच्या वेळेस स्वामींनी मला मांगल्य देऊन माझी दीर्घकालीन इच्छा पूर्ण केली. या सर्व गोष्टी किती सुसंगतपणे जुळून आल्या.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा