ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."
१२
सहस्त्र मातांचे प्रेम
जन्मापासून माझा हाच स्वभाव आहे. शाळेत असताना मी लहान मुलांसाठी रामायण, महाभारत आणि भागवतावर आधारित नाटके लिहित असे. त्यावेळी मी लिहीले होते, " कैकयी आणि मंथरा यांची काहीच चूक नव्हती, हे सर्व अवतार कार्यासाठीच घडले. तरीसुद्धा जग कैकयीला दोषी ठरवते. कोणी त्यांच्या बाळाचं नाव कैकयी ठेवत नाही. कौसल्या, सुमित्रा नावाने हाक मारतील, पण कैकयी नाही; जग तिचा इतका तिरस्कार करतंय. ' मी हे नाटक ' कैकयी एक हुतात्मा' - अशा नूतन दृष्टिकोनातून लिहिले होते. कैकयीशिवाय रामायण होऊच शकत नाही. रामाच्या वैभवासाठी तिने तिचं जीवन पणाला लावले. सगळं जग कैकयीला क्रूर स्त्री म्हणून संबोधते. तिने केवळ अवतार कार्यासाठी स्वतःचा बळी दिला. अवतार कार्यासाठी कोणालातरी त्याग करावाच लागतो. हे सात लोकपण कैकयीसारखेच आहेत. जशी मी कैकयीची बाजू मांडण्याची पराकाष्ठा केली, त्याचप्रमाणे मी आता \या सात लोकांसाठी लढते आहे.
माझं दुःख असह्य होऊन स्वामींनी २९ डिसेंबर २००८ ला एक संदेशपर काव्य पाठवले. ते असे होते.....
प्रेमळ मातेच्या वात्सल्याचा निर्झर सरितेसम झरू देत
जगज्जननीच्या वात्सल्याचा निर्झर सरितेसम झरू देत
मी दाखविले निजधाम तुला,
तरी तू आक्रंदसी का ?
सामावू सर्वांना आपुल्या प्रेमवाहिनीत
संयोग आपुला पंचअवतारात
का बरे आक्रंदसी पंचवटी सीतेसम ?
असे तव हृदयी मी राम, आत्माराम
असशी तू तेज नेत्रांचे, उमलणारे कमल जसे
असशी तू मधुर महाकाव्य, नजराणा स्वामींच्या जीवनी
हृदयवीणेवरी वाजवी साई सामवेद
इथे ना आदि ना अंत
सारे काही परतते उगमाकडे
तू तर ज्योत स्वामींच्या चरणकमली !
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा