रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

        " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते."

१३ 
नभ गुरु 
 

१ मार्च २००९ पुट्टपर्ती
 
मी नजर टाकली नाभाकडे 
रंगीबेरंगी !
गुलाबी, नारिंगी, निळा, जांभळा, सफेद, काळा.... 
कितीतरी रंग! रंगांची उधळण 
आपणासी ठावे तो स्वर्गीय वास्तुविशारद 
नाना रंगछटांनी रंगविले सारे त्याने 
असा हा कोण स्वर्गीय चित्रकार ?

हे नभा ! उगवत्या सूर्याने नाही का होत होरपळ तुझी 
हजारो मैल दूर आम्ही 
तरीही तो आम्हा जाळी 
जाणीव तुजला नसे कां ह्याची ?
वर्षाव करी शीतलं चांदणे, पौर्णिमेचा चंद्र हा 
हजारो मैल दूर आम्ही 
तरीही जाणवे आम्हां शितलता तयाची 
मेघ दाटती आणि विखुरती, 
परंतु तूची.जाणसी, ते तर भगवंताचे सरते ढग. 

तूच साक्षीदार माझ्या ५७ वर्षांच्या प्रदीर्घ आक्रंदनाचा 
एकाकी स्मित परमेश्वराशी माझे 
भगवंताने का दिला परिचय माझ्या बाह्य जगतासी 
परिचय होता ऊन पाऊस वाऱ्यामध्ये 
दुःख सोसते मी अपार 
कृष्णमेघ दाटले अवतीभवती 
मार्ग न दिसे मज 
अंधाराची साथ मिळे 
हे नभा, तुज भय नाही का अंधाराचे ?
धग सूर्याची, शीतलता चंद्रमाची 
सरते नभ, अंधार, उजेड 
परिचित तू या साऱ्यांशी, तू तर शांत, जसा स्थितप्रज्ञ. 
परिचित मी माझ्या एकाकी जीवनाशी 
असे मज भीती या साऱ्यांची 
कशी सोसशी तू धग सूर्याची 


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा