गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

        "जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

            हे माझ्या प्रेमाचे स्वरूप आहे. हे असे प्रेम आहे ज्याचा जगात सर्वांवर वर्षाव होतो. माझ्यावर अपकार करणाऱ्यांवर मी उपकारच करीन. मला त्यांना कर्मकायद्याच्या शिक्षेच्या जबड्यातून मुक्त करायचे आहे. हे मातृभावाचे प्रात्यक्षिक आहे.
            स्वामी म्हणाले, " मंथरेने रामावतारात चूक केली. तिला फक्त कृष्णावतारातच क्षमा झाली. तरीसुद्धा तू विचारते आहेस ?" सर्वोच्च अवतार पृथ्वीवर असताना आपल्याला क्षमा मिळणे हे अगदी योग्य होईल. पुढील अवतारात काय होईल कुणास ठाऊक? म्हणूनच मी या क्षणी मागते आहे !
            जगाच्या कल्याणासाठी या अवताराकडून मला जितके प्राप्त करता येईल तितके मी करीन. मी केवळ याच कार्यासाठी जन्म घेतला आहे. मी या अवताराला घट्ट धरून ठेवीन. त्यांचा मला जगासाठी परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे.

*     *     * 


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा