ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक -११
हे पांडवांच्या दुता, तू कर्माचा तराजू समतोल करतोस. हे निरंजना, नृसिंहा, मला सन्मार्गावर घेऊन जा. कावेरीतटवासी श्रीरंगा, तू करुणामय आहेस. श्री रामाने तुझी भक्ती केली. तू मला तुझ्या चरणीकमली घे, हे कान्हा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम् ! जरी इतरांनी माझ्याविषयी अनास्था दाखवली तरी मला त्यांच्याविषयी आस्था वाटते. याचा मला मनस्ताप होतो. तू माझे सर्व दुःख दूर कर. मी अजाण आहे, अज्ञानी आहे. मला आत्मज्ञान दे आणि मृत व जीवित व्यक्तींकडून मला होणारे दुःख दूर कर. ज्ञान मिळाल्यानंतर मी त्यांची चिंता करणार नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित असतो. माझ्या मृत्यूनंतर तू मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम